भुईमूग उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत
By Admin | Updated: May 24, 2017 00:20 IST2017-05-24T00:20:16+5:302017-05-24T00:20:16+5:30
लाखनवाडा : लाखनवाडा परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भूईमुगाची पेरणी केली होती. मात्र यावर्षी उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

भुईमूग उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनवाडा : लाखनवाडा परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भूईमुगाची पेरणी केली होती. मात्र यावर्षी उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. लाखनवाडा परिसरातील शेतकऱ्यांचे भुईमुंग हे मुख्य पिकापैकी एक आहे.
परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाळा कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात भुईमुंगाचे पिक घेणे जवळपास बंदच केले आहे. मात्र यावर्षी उत्पादनाची आशा बाळगत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर भूईमुगाची पेरणी केली होती. लाखनवाडा परिसरात लहान मोठे अनेक धरणं आहेत आणि पाणी पिकाला पाहिजे त्या प्रमाणात देता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात भुईमुंग पिक घेण्याचा अनेक शेतकऱ्यांनी निर्णय घेतला. परंतु पुन्हा निसर्गाने शेतकऱ्यावर अन्याय केला. भुईमुंग पिकाचे उत्पादन एवढे घटले की मजुरीचा खर्च निघणे सुध्दा अवघड झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली नाही आई जेवण देईना आणि बाप भिक मांगु देईना कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतकऱ्याला संकटाचा सामना करावाच लागतो असे चित्र समोर येत आहे.