शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

आधार लिंकसाठी शेतकऱ्यांना बँकेत मोजावे लागताहेत पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:57 IST

बँक आॅफ महाराष्ट्र शाखेमध्ये आधार लिंक करण्यासाठी आलेल्या प्रत्येक शेतकºयाकडून १७७ रुपये भरून घेण्यात येत आहेत.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कर्जमाफीच्या चौकटीत बसणाºया एक लाख ९८ हजार १५९ शेतकऱ्यांपैकी सुमारे १९ टक्के शेतकºयांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत. त्यामुळे सध्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याच्या कामाला वेग आला आहे. परंतू वेगवेगळ्या बँकाचे वेगवेगळे नियम शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. बँकनिहाय नियमांमध्येही तफावत असून, बँकेत आधार लिंकसाठी शेतकºयांना पैसेही मोजावे लागत आहेत.शेतकºयांना दोन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी देण्याचा महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय आहे. या कर्जमाफीचा जिल्ह्यातील जवळपास एक लाख ९८ हजार १५९ शेतकºयांना लाभ होणार आहे. त्यासाठी सुमारे १३०० कोटी रुपयांच्या आसपास आकडा जाऊ शकतोे. सध्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी विविध प्रशासकीय बाबींची पुर्तता करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये सर्वप्रथम योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकºयांचे पीक कर्ज घेत असलेल्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न संलग्न असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी ३७ हजार शेतकºयांचे बँक खाते आधारकार्डशची संलग्न नाहीत. त्यामुळे बँक खात्याला आधार कार्ड जोडणीचे काम सध्या प्रत्येक बँकेत सुरू आहे. यासंदर्भात बँकांच्या प्रतिनिधींना आवश्यक त्या सुचना वरिष्ठस्तरावरून करण्यात आल्या आहेत. परंतू शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर आधार लिंकसाठी त्यांना विविध अडचणी येत आहेत. काही बँकामध्ये तर आधार लिंकचे पैसेही मागितले जात आहेत. मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेमध्ये आधार लिंक करण्यासाठी आलेल्या प्रत्येक शेतकºयाकडून १७७ रुपये भरून घेण्यात येत आहेत. मात्र इतर बँकेमध्ये असे पैसे न भरता आधार लिंक केले जाते. त्यामुळे शेतकºयांमधेही गोंधळ निर्माण होत आहे. अनेक शेतकरी बँक कर्मचाºयांशी सुद्धा वाद घालतात. प्रत्येक बँकेत वेगवेगळे नियम असल्याने शेतकरी अडचणीत सापडत आहेत. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता वेगवेगळ्या अ‍ॅक्टीव्हिटी असतात, त्यानुसार ते दर आकारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.ग्रामपंचायत स्तरावर याद्याआधार क्रमांक संलग्न नसलेल्या शेतकºयांच्या याद्या काही ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. तसेच बँकनिहाय सुद्धा याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ह्या याद्या पाहून बरेश शेतकरी आता आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करण्यासाठी बँकेत गर्दी करत आहेत.

सन्मान योजनेचा लाभ न मिळालेले ४७ हजार ९९९ शेतकरीजिल्ह्यात चार लाख ९१ हजार १५८ शेतकरी आहेत. त्यापैकी ३१ मार्च २०१९ दरम्यान तीन लाख एक हजार १६७ शेतकरी हे किसान क्रेडीट कार्ड धारक शेतकरी होते. जिल्ह्यातील एक लाख ९८ हजार १५९ शेतकरी हे थकबाकीदार होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या मात्र त्याचा लाभ मिळू न शकलेल्या शेतकºयांची संख्या ही ४७ हजार ९९९ होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँकPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी