शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाणी देण्यासाठी शेतकरी करतात रात्रीचा दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:29 IST

बुलडाणा: सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे. त्यासाठी  जमिनी ओलीत करण्याची कामे सुरू असताना शेतातील विद्युत  पुरवठा दिवसभर खंडित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शे तकर्‍यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागत आहे.

ठळक मुद्दे रब्बीवर महावितरणची वक्रदृष्टी शेतातील विद्युत पुरवठा दिवसभर राहतो खंडित 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे. त्यासाठी  जमिनी ओलीत करण्याची कामे सुरू असताना शेतातील विद्युत  पुरवठा दिवसभर खंडित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शे तकर्‍यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागत आहे. रब्बी  हंगामावर महावितरणची वक्रदृष्टी असल्याने रब्बी हंगामाच्या  सुरुवातीलाच शेतकर्‍यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी रब्बी हंगामात  फटका बसतो; मात्र यावर्षी महावितरणच्या अजब कारभाराने  शेतकरी त्रस्त झाले आहेत. मृग नक्षत्रात सुरुवातील झालेल्या  पावसावर मूग, उडीद, सोयाबीन ही खरीप हंगामातील पिके  कशीबशी आली. त्यानंतर परतीच्या पावसाने जलपातळीत वाढ  झाली असून, अनेक नदी, नाले, तलावातील पाणी साठा  वाढला. या पाणी साठय़ाच्या भरवश्यावर शेतकर्‍यांनी रब्बी  हंगामाची तयारी केली आहे. सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या  गहू, हरबरा  पेरणीला सुरुवात झाली आहे; मात्र खरिपाचा कस  रब्बी हंगामात भरून काढण्याच्या तयारीत असलेल्या शे तकर्‍यांना वीज वितरणशी संघर्ष करावा लागत आहे. परतीच्या  पावसाने यावर्षी पाणीसाठय़ात वाढ झालेली असल्याने रब्बी  हंगामाला पूरक इतका पाणीसाठी बहुतांश तालुक्यात उपलब्ध  आहे; परंतु मुबलक पाणीसाठा असूनही विद्युत पुरवठय़ाअभावी  ते रब्बी पिकाला पुरवले जाऊ शकत नाही. रब्बी हंगामातील गहू  पेरणीच्या सुरुवातीला अनेक शेतकरी शेतजमीनीला विद्युत पं पाच्या सहाय्याने पाणी देतात. तसेच तूर पीकही चांगले बहरलेले  आहे. रब्बी हंगामातील या सर्व पिकांना पाण्याची आवश्यकता  आहे; परंतु ऐनवेळी वीज कंपनीने विद्युत पुरवठा खंडित  केल्यामुळे तसेच १६ ते १७ तासाचे  शेतात भारनियमन  केल्यामुळे रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकर्‍यांसमोर संकट  उभे ठाकले आहे. काही शेतकर्‍यांनी विद्युत बिल भरले  नसल्याने विद्युत कनेक्शन कापण्यात आले आहे; मात्र ज्या शे तकर्‍यांनी विद्युत बिल भरलेले असते त्यांच्याही शेतातील विद्युत  कनेक्शन बंद आहे. १0 ते १५ शेतकर्‍यांचे विद्युत कनेक्शन हे  एका विद्युत रोहित्रावर असल्याने विद्युत बिल न भरलेल्या शे तकर्‍यांचे विद्युत कनेक्शन कापताना विद्युत रोहित्रावर  असलेल्या सर्वच शेतकर्‍यांना त्याचा फटका बसत आहे. रब्बी  पिकाला पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांसमोर भारनियमनाचा खोडा  निर्माण होत आहे.  

पाणी साठा असूनही रब्बी हंगाम धोक्यातजिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे  शेतकर्‍यांना रब्बीची  आस आहे. यासाठी अनुकूल वातावरण असून, जिल्ह्यातील  छोट्या-मोठय़ा लघू प्रकल्पामधील पाणी साठासुद्धा वाढलेला  आहे; परंतु विद्युत वितरण कंपनीकडून शेतीसाठी वेळेवर विद्युत  पुरवठा पुरवल्या जात नसल्याने  रब्बी हंगामाचे चित्र धोक्यात  दिसून आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे मुबलक  पाणी साठा असतानाही शेतकर्‍यांना त्याचा वापर करता येत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी