शेतकर्यांचा मोर्चा
By Admin | Updated: August 25, 2014 02:23 IST2014-08-25T02:15:37+5:302014-08-25T02:23:35+5:30
बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी मोर्चा काढला.

शेतकर्यांचा मोर्चा
बुलडाणा : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांनी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. वरुड येथील दलितांवर झालेल्या अन्यायाबाबत सखोल चौकशी करा, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले विकास महामंडळ, संत रोहीदास विकास महामंडळ आदींचे कर्ज माफ करा, शेतकर्यांवरील सरसकट विज बिल माफ करा आदी मागण्या मांडण्यात आल्या. संगम चौकातील सैनिक मंगल कार्यालयातून सदर मोर्चा निघाला. डॉ.मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्त्वात जयस्तंभ चौक, बाजार चौक, जनता चौक, कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा धडकला. यावेळी जिल्हाभरातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.