कृषिपंपाचे थकीत वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:37 IST2021-03-23T04:37:10+5:302021-03-23T04:37:10+5:30
तीन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील पूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे. ...

कृषिपंपाचे थकीत वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार
तीन वर्षांसाठी राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील पूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे. तसेच हे लाभ देऊन सुधारित करण्यात आलेल्या २०२० च्या देयकातील सुधारित थकबाकी पहिल्याच वर्षी भरल्यास ६६ टक्के, दुसऱ्या वर्षात ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षात २० टक्केच सवलत मिळणार आहे. सहायक अभियंता राजगुरू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिंचोली बोरे येथील शेतकरी संतोष राजगुरू यांच्यासह उपकेंद्रांतर्गतच्या इतर काही शेतकऱ्यांनी बिलाचा भरणा करून सदर योजनेचा लाभ घेतला. त्यात शेतकरी राजगुरू यांनी ८० हजार २७० रुपयांचा एक रकमी भरणा २० मार्च रोजी सुलतानपूर वीज वितरण कार्यालयात येऊन केल्याने त्यांचा व इतर शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वीज वितरण केंदाचे पंजाबराव बोबडे, एकनाथ राजगुरू, गणेश टकले, टापरे, एल.आर. पिसे, दीपक साळवे, योगेश निमकरडे, बोरे, फारक शाह, पिंटू जुमडे यांच्यासह बरेच शेतकरी उपस्थित होते.