शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कुटूंबाची भूतदया;  माकडांच्या कळपास दररोज पाजतात पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:34 IST

सोयंदेव येथील शेतकरी कुटुंब तहानेने व्याकूळ झालेल्या ६० ते ७० माकडांना दररोज पाणी पाजण्याचे काम करीत आहे.

ठळक मुद्दे बाळाभाऊ खरात यांचे शेत गावाजवळच आहेतेथील पाण्याचा साठा पाहून माकडांनी बाळाभाऊ यांचे शेताकडे मोर्चा वळविला. तहानेने व्याकूळ झालेल्या माकडांना हाकलून देऊनही ती तेथून जाईनात.

- अशोक इंगळे लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्यासाठी माणसांची वणवण भटकंती होत असून जनावरांचे हाल होत आहे. सोयंदेव येथील शेतकरी कुटुंब तहानेने व्याकूळ झालेल्या ६० ते ७० माकडांना दररोज पाणी पाजण्याचे काम करीत आहे. शेतकरी कुटूंबाची भूतदया माणूसकिचा परिचय देणारी आहे.सोयंदेव येथील शेतकरी बाळाभाऊ खरात, पत्नी मंदोधरी बाळाभाऊ खरात, मुुुलगा किरण खरात, सूूून गीता किरण खरात व भाऊ रावसाहेब खरात हे गावाशेजारी असलेल्या शेतात राहतात. शेतात विहीर, हौद असल्याने झाडे हिरवीगार आहेत. उन्हाचा पारा चढत असल्याने अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे थंड विसाव्यावर माणसेच काय जंगली प्राणीही येऊ लागले. जंगलातील माकडांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु होती. तहानेने व्याकूळ माकडांची तगमग वाढली. बाळाभाऊ खरात यांचे शेत गावाजवळच आहे. त्यांच्या शेतावर पुरेसे पाणी आहे. आपल्या घरी लागणारे धुणीभांड्यासह लागणारे पाणी व जनावरांना लागणारे पाणी वापरुन त्यांचेकडे पाणी उरते. शिवारात कोठेच पाणी नाही. तेथील पाण्याचा साठा पाहून माकडांनी बाळाभाऊ यांचे शेताकडे मोर्चा वळविला. सुरुवातीला त्यांनी माकडांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला .मात्र तहानेने व्याकूळ झालेल्या माकडांना हाकलून देऊनही ती तेथून जाईनात. अत्यंत व्याकूळ चेहऱ्यांनी विनवणी करीत असल्याची जाणीव त्यांना झाली. मंदोदरी खरात यांच्यातील भूतदया जागृत झाली.स्वत: पुढे होऊन त्यांनी माकडांना पाणी पिण्यासाठी भांडी भरुन ठेवली. सर्व माकडे भितभित लगबगीने पाणी पिऊन तृप्त होऊन निघून गेले. दुसरे दिवशीही माकडांची टोळी पाणी पिण्यासाठी तेथे पुन्हा येऊन थडकली. दुसरे दिवशीही त्या माऊलीने त्या माकडांना सह्रदयतेने पाणी पाजून तृप्त केले.गेली दोन महिन्यांपासून मंदोदरी बाळाभाऊ खरात, सून गीता किरण खरात, किरण बाळाभाऊ खरात, रावसाहेब रामराम खरात हे संपूर्ण कुटुंबीय दररोज माकडांना पाणी पाजतात. पाण्यावाचून तडफडणाºया माकडांना पाणी पाजण्याचे पूण्यकर्म करतात. हीच ईश्वरसेवा आहे असे त्यांना वाटत असून मनाला समाधान लाभते. पाणी पाजणे हे पुण्याचे काम असल्याचे कुटूंबीय सांगतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई