लाल मिरचीने आणले शेतक-यांच्या डोळ्यात पाणी
By Admin | Updated: May 17, 2017 14:08 IST2017-05-17T14:08:50+5:302017-05-17T14:08:50+5:30
मिरचीचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लाल मिरचीने आणले शेतक-यांच्या डोळ्यात पाणी
बुलडाणा : सातत्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमी मिळत नसल्याने शेतकरी
हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. मात्र
मिरचीचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात मोताळा, मेहकर, चिखली तालुक्यात सिंचनाच्या सोयी असल्यामुळे
अनेक शेतकरी मिरचीचे पिक घेतात. या भागात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड
करण्यात आली आहे. मात्र मिरचीचे भाव पडले आहे. शेतकऱ्यांना उत्पादन
खर्चाऐवढाही भाव मिळत नाही. सर्वत्रच ही परिस्थिती असल्यामुळे अन्य
राज्यातील शेतकरीही मिरची विकण्याकरिता बुलडाण्यात आले आहेत. सध्या
बुलडाण्यातील चिखली रोडवर कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्हातील शेतकऱ्यांनी
लाल मिरची विक्रीसाठी आणली आहे. ६० रूपये किलोने ही मिरची सध्या विकली
जात आहे. कर्नाटकातुन जवळपास १० कुटूंबातील सदस्यांनी मिरची विकण्यासाठी
बुलडाणा शहरात दाखल झाले आहेत.