विजेच्या धक्क्याने शेतकर्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:58 IST2017-09-21T00:58:23+5:302017-09-21T00:58:47+5:30
मलकापूर: तालुक्यातील मौजे निमखेड शिवारात वीज तारेचा शॉक लागून ४७ वर्षीय शेतकर्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

विजेच्या धक्क्याने शेतकर्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: तालुक्यातील मौजे निमखेड शिवारात वीज तारेचा शॉक लागून ४७ वर्षीय शेतकर्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
लक्ष्मण विश्वनाथ क्षीरसागर (वय ४७) हे १९ सप्टेंबर रोजी तणनाशक फवारणीसाठी गेले होते; पण सायंकाळी उशिरापर्यंत परतले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेतला असता लक्ष्मण क्षीरसागर स्वत:च्या शेतातच मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले.
शेतमजुराची आत्महत्या
बावनबीर: येथील शेतमजूर संजय पुंजाजी तायडे (वय ३१ वर्ष) यांनी मंगळवार १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या वेळी उपस्थित डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू
एकलारा बानोदा: येथील १५ वर्षीय युवतीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना २0 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
निकिता संतोष पवार ही नवव्या इयत्तेत शिकणारी मुलगी नळाचे पाणी भरत असताना तिला विजेचा धक्का लागला. यात ती गंभीर झाल्याने तिला उपचारार्थ शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने ती दगावली. तिच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
-