थ्रेशरमध्ये अडकल्याने शेतकर्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:13 IST2017-09-13T00:13:15+5:302017-09-13T00:13:15+5:30

थ्रेशरमध्ये अडकल्याने शेतकर्याचा मृत्यू
ठळक मुद्देअंभोडा शिवारातील घटना उडीद काढत असताना थ्रेशरमध्ये फसून तरुण शेतकर्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: तालुक्यातील अंभोडा शिवारातील एका शेतात उडीद काढत असताना थ्रेशरमध्ये फसून तरुण शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली.
बुलडाणा तालुक्यातील अंभोडा येथील अमोल नारायण पवार (वय २९) हा तरुण शेतकरी गावातील शंकर तायडे यांच्या शेतात उडिदाचे पीक थ्रेशरमधून काढत होता. दरम्यान, दुपारी १२.३0 वाजता अमोलचा हात थ्रेशरमध्ये ओढला गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृतक अमोल हा अविवाहित होता. त्याचा मोठा भाऊ काही महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर उलटून ठार झाला होता. दोन्ही भावांचे अपघाती निधन झाल्यामुळे अंभोडा गावावर शोककळा पसरली आहे.