शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोणार तालुक्यात पेरणीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 13:26 IST

लोणार: लोणार तालुक्यामध्ये दमदार पावसानंतर पेरणीची लगबग सुरू झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: लोणार तालुक्यामध्ये दमदार पावसानंतर पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसापासून दररोज झालेल्या संततधार पावसाने शेतकरी सुखावला आहे.मृग नक्षत्र पुर्णता कोरडा गेल्यानंतरही तालुक्यात पावसाचा पत्ता नव्हता. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, २६ जूनला मध्यरात्रीला दमदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे बळीराजा सुखावला आहे. गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसात तालुक्यात चांगला पाऊस झाला. २६ जूनला शाळेला सुरुवात झाली, परंतू त्याचदिवशी सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने विद्यार्थ्यांना काही ठिकाणी शाळेत जाण्यासाठी त्रास सोसावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एसटी बस सुद्धा रस्त्यावरील चिखलामुळे काही ठिकाणी बंद होती. रस्त्याच्या काही भागामध्ये पाणी तुंबून राहिले होते. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी व शुक्रवारी दिवसभर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात केली आहे. सध्या ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना शेतकरी दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठेत काही ठिकाणी चिखल झाला होता. शहरातील सांडपाण्याच्या नाल्यामधील पाणी रस्त्यावरून वाहत होते. काही जलाशये, तलावांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. लोणार तालुक्यात बुधवारला ९ मि.मी. पाऊस झाला. तर गुरुवारी ५० मि.मी., शुक्रवारी दोन मि. मी. व शनिवारला आठ मि. मी. पाऊस झाला आहे. तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसासह वादळी वाराही आहे. त्यामुळे काही ठिकाणी विद्युततारांवर झाडाच्या फांद्या कोसळून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येत आहे. नदी, नाले, प्रवाहित होत आहेत. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :LonarलोणारagricultureशेतीbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी