विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:03 IST2017-07-29T23:37:32+5:302017-07-30T01:03:05+5:30
लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील ५२ वर्षीय शेतक-याने शेतात विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली.

विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव कुंडपाळ : लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील एका ५२ वर्षीय शेतकºयाने आपल्या शेतात विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या देण्याची घटना २९ जुलै रोजी उघडकीस आली.
रामकिसन गाढवे २८ जुलै रोजी दे. कुंडपाळ चिंचोली सांगळे शिवशेजारील शेतात गोठ्यावर रात्री झोपायला जातो असे म्हणून घरून गेले होते. शनिवारी सकाळी त्यांचा भाऊ उद्धव साहेबराव गाढवे हे आपल्या शेतात सकाळी गेले असताना त्यांना गोठ्यासमोर रामकिसन यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पो.पा. आसाराम खोमणे, कोतवाल नरवाडे, सरपंच पती लक्ष्मण सरकटे, उपसरपंच बबनराव सरकटे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास पो.काँ. साहेबराव इंगळे पो.स्टे. लोणार हे करत आहेत.
मृतक शेतकरी रामकिसन गाढवे यांच्यावर बँकेचे सव्वा लाख रुपयांचे कर्ज होते. कर्जमाफी होईल, अशी त्यांना आशा होती. तसेच नव्याने बँकेकडून शासनाने जाहीर केलेली १० हजारांची मदत मिळेल या आशेने त्यांनी बँकेतून शेतात येऊन औषध फवारणीचे काम केले होते; मात्र कर्जमाफीला विलंब झाल्याने त्यांनी विष प्राशन केले.
सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, पत्नी, भाऊ वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.