शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:49 IST2017-08-03T00:47:35+5:302017-08-03T00:49:17+5:30

धानोरा : जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथील शेतकरी पुत्र मंगेश रामदास घुटे (वय ३५) यांनी २ ऑगस्टला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Farmer suicides by son's death | शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देजळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथील घटना२ ऑगस्टला रामदास घुटे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या चार-पाच वर्षे सततची नापिकी; आाणि कर्जाचा डोंगर

धानोरा : जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथील शेतकरी पुत्र मंगेश रामदास घुटे (वय ३५) यांनी २ ऑगस्टला गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथील रामदास घुटे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. गेली चार-पाच वर्षे सततच्या नापिकीला सामोरे गेलेल्या या कुंटुबाकडे भारतीय स्टेट बँकेचे ६0 हजार आणि व्याज, त्याचप्रमाणे खासगी बँकेचे एक लाख आणि त्यावरील व्याज, असा कर्जाचा डोंगर आहे. एकत्रित कुटुंब असलेल्या रामदास घुटे यांना चार मुले आहेत. सध्या शेतीच्या मशागतीकरिता पैसे नसल्याने कुटुंबात मोठा असलेला मंगेश घुटे विवंचनेत होता. अशातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा, असा आप्त परिवार आहे. 

Web Title: Farmer suicides by son's death