गळफास घेऊन  शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:05 IST2017-09-29T01:05:11+5:302017-09-29T01:05:26+5:30

चांडोळ : येथील गंफार खा नजिब खा पठाण (वय ४५ वर्षे) या  शेतमजुराने गावाशेजारील शेतात गुरुवारी सकाळी गळफास  घेऊन आत्महत्या केली.

Farmer suicides by hanging | गळफास घेऊन  शेतमजुराची आत्महत्या

गळफास घेऊन  शेतमजुराची आत्महत्या

ठळक मुद्देगंफार खा नजिब खा पठाण (वय ४५ वर्षे) या  शेतमजुराने गावाशेजारील शेतात गुरुवारी सकाळी गळफास  घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
चांडोळ : येथील गंफार खा नजिब खा पठाण (वय ४५ वर्षे) या  शेतमजुराने गावाशेजारील शेतात गुरुवारी सकाळी गळफास  घेऊन आत्महत्या केली.
गफार खा नजिब खा यांनी    चांडोळ गावालगत असलेल्या शे तकरी प्रल्हाद सांडुसिंग बारवाले यांच्या शेतात गट नं. १२५ मध्ये  निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या  केली. गावातील नागरिकांना गुरुवारी सकाळी १0 वाजताच्या  दरम्यान आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.  त्यानंतर एकच  खळबळ उडाली. त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.  गफार खा नजिब खा यांचे भाऊ आसीब खा नजिब खा यांनी  धाड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून धाड  पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  बीट जमादार श्रीकृष्ण राहणे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन मोरे,  वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास  पोलीस करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत आत्महत्येचे कारण समजू  शकले नाही.
  गफार खा नजिब खा यांच्या कुटुंबात पत्नी व ४ मुली, दोन  दिव्यांग मुले असा आप्त परिवार आहे.  घरातील कर्ता पुरुष मय त पावल्याने सर्व जबाबदारी त्याचे पत्नीवर येऊन ठेपली आहे.   

Web Title: Farmer suicides by hanging