शेतकोटी वृक्षारोपणातील रोपे नामशेष
By Admin | Updated: January 7, 2017 20:50 IST2017-01-07T20:50:31+5:302017-01-07T20:50:31+5:30
बुलडाणा येथील ट्री-गार्ड बेपत्ता.

शेतकोटी वृक्षारोपणातील रोपे नामशेष
बुलडाणा, दि. ७- सन २0१५-१६ मध्ये खरेदी केलेल्या ५ हजार ६00 वृक्षांपैकी १ हजार ५00 वृक्ष नर्सरीमध्ये उरलेली असतांना पालिकेने यावर्षी शतकोटी योजनेंतर्गत पुन्हा १ हजार ५00 वृक्षांची खरेदी करुन वृक्षारोपण केले. यावर्षी १ हजार २९३ ठिकाणी वृक्षारोपण करून ट्री गार्ड बसविल्याचा दावा नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र वृक्षारोपण खड्डयातील रोपे नामशेष झाले असून अनेक खड्डयातील ट्री-गार्ड बेपत्ता झाले आहेत.
बुलडाणा नगरपालिका नागरिकांकडून दरवर्षी वृक्षारोपण कर वसुल करते. तर दरवर्षी वृक्षारोपण करण्याची मोहीम राबविण्यात येते. यावर्षीही बुलडाणा पालिकेने तत्कालीन २७ वार्डात वृक्षारोपणासाठी खड्डे खोदून वृक्षारोपण केले. पालिकेच्या अहवालानुसार चिखली मलकापूर रस्ता दुतर्फा, पेट्रोल पंप ते सक्यरुलर रोडने धाड नाक्यापयर्ंत दुतर्फा, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे रस्त्यालगत, कार्यकारी अभियंता यांचे बंगल्यासमोरील रस्त्यालगत, सर्किट हाऊस परिसर, संगम चौक, दलाल चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक दुतर्फा, पोस्ट ऑफीस चौक ते जयस्तंभ चौक, दूरदर्शन केंद्र इमारत परिसर, तहसील चौक ते सक्यरुलर रोड पयर्ंत, शहरातील विविध प्रभागातील भूखंडावर, नगर परिषद शाळा परिसर, आयटीआय इमारतीच्या समोरील रिंग रोडवर दुतर्फा, तहसील चौक ते सर्कीट हाऊस पयर्ंत दुतर्फा, असे वृक्ष लावण्यात आले आहे.
सदर वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण लागवड अधिकारी यांचे १७ जुन २0१५ चे पत्रानुसार पालिकेने २ लाख २२ हजार ६२५ रुपयांची रोपे खरेदी केली होती. २४ जुन २0१५ रोजी या रोपांच्या देयकांचा भरणा करण्यात आला. विविध जातीचे एकुण ५,६00 वृक्ष खरेदी करण्यात आले. पालिकेने खरेदी केलेल्या वृक्षांपैकी ४ हजार १00 रोपे शहरातील कार्यालयांना, सामाजिक संस्थांना वृक्ष लागवडी करता वाटप करण्यात आले. तर उर्वरीत १,५00 रोपे नर्सरीमध्ये ठेवण्यात आली. तसेच पुन्हा जुलै २0१६ या कालावधीत वन महोत्सवानिमित्त १,५00 वृक्षांची खरेदी २४ जून २0१६ रोजी ७९ हजार ५00 रुपये भरणा करून करण्यात आली. या मध्ये करंजी , खायाळ, निंब, कारनेट, पिंपळ, बकुळ असे प्रत्येकी २00 तर जारुळ, कांचन, वड असे प्रत्येकी १00 रोपे खरेदी केल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी लागवड अधिकारी यांना पत्र दिलेले आहे. तसेच शहरातील वृक्षारोपणासाठी नगर पालिकेने ६२ हजाराची ट्री-गार्ड खरेदी केलेली आहे. यावर्षी पावसाळ्यात लावलेल्या वृक्षांची संख्या १ हजार २९३ इतकी आहे. त्यानुसार पालिकेने १ हजार २00 ट्री गार्डची खरेदी केली. १,३५0 रुपये दराने ६२ हजाराची सदर ट्री गार्ड खरेदी करण्यात आले. त्याचे देयकही अदा करण्यात आले असल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद केले आहे.
जनतेच्या पैशाची बरबादी
सन २0१५-१६ मध्ये २ लाख २२ हजार ६५0 रूपये किंमतीचे ५ हजार ६00 रोपे खरेदी करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ५00 रोपे नर्सरीत ठेवण्यात आले होते. तरीही सन २0१६-१७ मध्ये मागिल रोपे शिल्लक असताना पुन्हा १ हजार ५00 रोपे खरेदी केले. त्यापैकी केवळ १ हजार २९३ रोपे लावण्यात आले. या रोपांना पाणी देण्याचे कोणतेच नियोजन नाही. वृक्षारोपणासाठी १ हजार २00 ट्री-गार्ड खरेदी करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणची ट्री-गार्ड बेपत्ता आहेत. वास्तविक पालिकेने वृक्षारोपण करणे, ट्री-गार्ड खेरदी करणे म्हणजे जनतेच्या पैशाची बरबादी आहे, असा आरोप एन.एन.अग्रवाल, अँड.डि.एन.पाटील, अँड.विनोद नरवाडे, अँड. दिनेश गवई यांनी करून पालिकेने लावलेले १ हजार २00 ट्री-गार्ड मोजन दाखवावे, अन्यथा अनावश्यक खर्च केलेला जनतेचा पैसा जनतेच्या बँक खात्यात जमा करावा, अशी मागणी केली आहे.
शहरात वृक्षारोपण केलेल्या रोपांना नियमित पाणी देण्यात येत आहे. मात्र ज्या ठिकाणची रोपे किंवा ट्रि-गार्ड बेपत्ता आहे, याची माहिती मिळाल्यास चौकशी करण्यात येईल.
-करणकुमार चव्हाण, मुख्याधिकारी, बुलडाणा.