पेरे प्रमाणपत्राच्या फे-यात शेतकरी!
By Admin | Updated: July 21, 2016 23:45 IST2016-07-21T23:45:26+5:302016-07-21T23:45:26+5:30
पीक विमा योजनेत मोठी अडचण; अट शिथिल करणे आवश्यक.

पेरे प्रमाणपत्राच्या फे-यात शेतकरी!
चिखली (जि. बुलडाणा): नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण देण्याच्या हेतूने प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप हंगाम सन २0१६-१७ करिता लागू करण्यात आली आहे. या पीक विम्यासाठी हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे, तर दुसरीकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना तलाठय़ांमार्फत दिले जाणारे पेरे प्रमाणपत्राची अट घालून दिली आहे. वस्तूत: तलाठय़ांच्यावतीने १ ऑगस्टनंतरच हे प्रमाणपत्र शेतकर्यांना मिळणार असल्याने शेतकरीवर्ग पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुल आहे; परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या शेतात असलेल्या पिकाचे पेरे प्रमाणपत्र आवश्यक आहे. वस्तूत: हे पेरे प्रमाणपत्र तलाठय़ांमार्फत १ ऑगस्टनंतरच मिळणार असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ केवळ या प्रमाणपत्राअभावी शेतकर्यांना न मिळण्याची स्थिती सध्या तालुक्यात उद्भवली आहे. पीक विम्याचा अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै, तर पेरे प्रमाणपत्र मिळण्याची तारीख १ ऑगस्टनंतरची असल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.