शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 21:27 IST

या घटनेमुळे या परिसरात दहशत पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत असल्याने वन विभागाने त्या भागातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

चिखली :(बुलढाणा) : तालुक्यातील शेलोडी शेत शिवारात गव्हाच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 35 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवार 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.

विठ्ठल तुकाराम काटे  वय 35 रा.शेलोडी असे जखमी शेतकर्‍याचे नाव असून सदर शेतकरी हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान, स्प्रिंकलरचा टप्पा बदलत असताना गव्हांत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात विठ्ठल काटे यांच्या हाताला, छातीला आणि खांद्याला जबर  जखमा झाल्या आहेत.

अचानक झालेल्या या हल्ल्याचा निकराने सामना करताना काटे यांनी आरडाओरड केल्याने  आवाज ऐकून बाजूच्याच शेतातून कैलास घाटगे, हरिदास चव्हाण, एम काटे, तुळशीदास घाटगे, रवींद्र घाटगे, छडानंद घाटगे हे शेतकरी मदतीसाठी धाऊन आले  व त्यांनी आरडा-ओरड केली असता बिबट हा पळून गेला. दरम्यान जखमी शेतकरी विठ्ठल काटे यांना तातडीने चिखली येथील डॉ. विष्णू खेडेकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.

या घटनेमुळे या परिसरात दहशत पसरली असून शेतकर्यामधून भीती व्यक्त होत असल्याने वन विभागाने त्या भागातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रात्री 9 च्या सुमारास आमदार राहुल बोन्द्रे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी विठ्ठल काटे यांची रुग्णालयात भेट घेऊन धीर दिला.

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरी