शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप सरकविण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:17 IST

कृषीपंप बॅकवाटर जवळ नेण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक वीज आली व त्याचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला.

लोणार :  तालुक्यातील हिरडव येथील बापलेकाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना १७ मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली. हिरडव लगत असलेल्या तलावावर शेती सिंचनासाठी लावण्यात आलेला कृषीपंप थोडा मागे सरकविण्यासाठी पहाटे ते गेले असता ही दुर्देवी घटना घडली.हिरडव लगत एक तलाव असून या तलावातील बॅक वॉटरचा शेती सिंचनासाठी या परिसरातील नागरिक उपयोग करतात. मात्र उन्हाळा असल्याने व पाण्याचा तलावातून उपसा होत असल्याने तलावातील पाणी कमी होत आहे. त्यामुळे बॅकवॉटरही कमी होत होेते. परिणामी शेतीला पाणी देण्यात  अडचण येत असल्याने पहाटेच हिरडव येथील जनार्दन निवृत्ती मैराळ (५०) आणि त्यांचा मुलगा नीलेश जनार्दन मैराळ (३४) हे तलावावर गेले होते. पहाटे त्यांचा कृषीपंप बॅकवाटर जवळ नेण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक वीज आली व त्याचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.हा प्रकार या भागात पहाटे अशाच कामासाठी आलेल्या काही शेतकºयांच्या निदर्शनास आला व मग धावपळ सुरू झाली. दरम्यान, सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पाण्यात पडलेले दोघा बापलेकांचे मृतदेह बाहेर काढण्यास त्यांनी प्रारंभ केला होता. सोबतच घटनेचाही पंचनामा हे पोलिस करीत आहेत.

वेळे आधीच वीज आल्याने झाला घात?हिरडव परिसरात साधारणत: पहाटे सात वाजेच्या सुमारास वीज येते. त्यानुषंगाने त्यापूर्वी शेतात जावून कृषी पंप तलावाच्या बॅकवाटर लगत हलविण्यासाठी हे दोघे गेले होते. मात्र नेमकी १७ मे रोजी वीज वेळे आधी आली आणि वीजेचा प्रवाह अचानक पाण्यात आला. त्यातच या शेतकरी पिता-पुत्राचा  दुर्देवी मृत्यू झाल्याची चर्चा सध्या घटनास्थळी असलेल्या शेतकरी व नागरिकांमध्ये आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणारFarmerशेतकरीAccidentअपघात