लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यातील वसंत नगर येथील शेतकऱ्याने आपली दोन एकर वरील द्राक्ष बाग मोडून टाकली आहे. चार वर्षांपूर्वी लावलेल्या द्राक्ष वेलींना फळधारणा झाली नाही, लाखोंचा खर्च करून जोपासलेली बाग उत्पन्न देत नसल्याने झाबु लखु पवार यांनी कुऱ्हाडीचा घाव घालून द्राक्ष बाग नष्ट केली. दोन एकरात जवळपास २ हजार चारशे झाड पवार यांनी लावली होती. दरम्यानच्या काळत पीक विमा मिळाला नाही, तसेच बँकांनीही कर्ज दिले नसल्याने नाराज झालेल्या पवार यांनी बाग उध्वस्त केली आहे. नुकताच फळ पीक विमाही जाहीर झाला आहे. मात्र सातत्याने द्राक्ष बागेतून लाभ होण्याऐवजी तोटाच होत असल्याने पवार यांनी हे पाऊल उचलेले. दरम्यान, कधी काळी बुलडाणा जिल्ह्यातील द्राक्ष हे मध्यप्रदेश, दिल्ली आणि गुजरातलाही जात होती. बुलडाणा जिल्ह्यात द्राक्षबागायदारांचा एक संघही कार्यान्वीत आहे. मात्र अलिकडील काळात हवामानातील बदल या पिकासाठी जिल्ह्यात काहीसा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे काही मोजक्या ठिकाणीच सध्या द्राक्ष बागा आहेत. २००० च्या दशकात चिखली तालुक्यात काही प्रमाणात द्राक्ष बागा होत्या.
शेतकऱ्याने दोन एकरावरील द्राक्ष बाग केली नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:51 IST
Buldhana Farmer News द्राक्ष बागेतून लाभ होण्याऐवजी तोटाच होत असल्याने पवार यांनी हे पाऊल उचलेले.
शेतकऱ्याने दोन एकरावरील द्राक्ष बाग केली नष्ट
ठळक मुद्देचार वर्षांपूर्वी लावलेल्या द्राक्ष वेलींना फळधारणा झाली नाही.दोन एकरात जवळपास २ हजार चारशे झाड पवार यांनी लावली होती.