शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST2021-04-02T04:36:02+5:302021-04-02T04:36:02+5:30

अंढेरा : येथून जवळच असलेल्या ग्राम पाडळी शिंदे येथील एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

Farmer commits suicide by strangulation! | शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

अंढेरा : येथून जवळच असलेल्या ग्राम पाडळी शिंदे येथील एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली.

देऊळगाव राजा तालुक्यात येणाऱ्या पाडळी शिंदे येथील रहिवासी परसराम विठोबा शिंदे यांच्याकडे पाडळी शिंदे येथील शिवारात मुलाच्या नावाने शेती असून ते अल्प भूधारक कुटुंब असून शिंदे हे नेहमीच सततच्या नापिकीने वैफल्यग्रस्त मन:स्थितीत राहत होते. दरम्यान, कुठल्याही बँकेचे कर्ज त्यांनी घेतले नसल्याची माहिती आहे. ३१ मार्च रोजी पत्नी व मुलगा शेतात गेल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे. मृत परसराम शिंदे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास बिट जमादार विकास देशमुख हे करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरता मृतदेह देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात नेला होता व उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर मूळ गावी पाडळी शिंदे येथील स्मशानभूमीत १ एप्रिल रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Farmer commits suicide by strangulation!