ज्ञानगंगा नदीपात्रात बुडून शेतमजुराचा मृत्यू; नारायणपूर शिवारातील घटना
By विवेक चांदुरकर | Updated: July 26, 2023 15:15 IST2023-07-26T15:13:27+5:302023-07-26T15:15:33+5:30
याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानगंगा नदीपात्रात बुडून शेतमजुराचा मृत्यू; नारायणपूर शिवारातील घटना
नांदुरा (बुलढाणा) : तालुक्यातील निमगाव गावाजवळ नारायणपूर येथील शेतमजूर अनंता नारायण काकर यांचा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २६ जुलै रोजी उघडकीस आली.
तालुक्यातील नारायणपूर येथील शेतमजूर अनंता नारायण काकर २५ जुलै रोजी सकाळी शेतात मजुरी करण्याकरीता गेले होते. संध्याकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी व गावातील नागरिकांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र २६ जुलै रोजी त्यांचा मृतदेह नारायणपूर शिवारातील ज्ञानगंगा नदी पात्रात दिसून आला. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्ञानगंगाला पूर आला आहे. या पुरात अनंता काकर यांचा बुडाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.