शेतीच्या वादातून हाणामारी

By Admin | Updated: June 22, 2015 02:10 IST2015-06-22T02:10:20+5:302015-06-22T02:10:20+5:30

मेहकर शिवारातील घटना; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल.

Farm Fights | शेतीच्या वादातून हाणामारी

शेतीच्या वादातून हाणामारी

मेहकर (जि. बुलडाणा): : शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २0 जून रोजी सकाळी ११ वाजता मेहकर शिवारात घडली.
येथील इंद्रजित विनय सावजी (२७) यांनी बुलडाणा बँकेच्या हर्रासीद्वारे मंदाकिनी भिमराव कंकाळ यांची शेती विकत घेतली. त्यानंतर नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून इंद्रजित सावजी यांनी सदर शेतीवर ताबा घेतला. दरम्यान, २0 जून रोजी शेतात पेरणी करण्यासाठी गेले असता त्यांना मंदाकिनी कंकाळ, अमोल कंकाळ, मुकुल कंकाळ, माधव दळवी यांच्यासह १0 ते १२ जणांनी लाठीकाठी व कुर्‍हाडीने मारहाण केली. इंद्रजित सावजी यांनी या प्रकरणात मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मंदाकिनी कंकाळ यांनीही परस्परविरोधी फिर्याद दिली. त्या शेतात जात असताना त्यांना रस्त्यात अडवून इंद्रजित सावजी, विनय सावजी तसेच १0 जणांनी मारहाण केली तसेच जातिवाचक शिवीगाळ केली, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी इंद्रजित सावजी, विनय सावजी यांच्यासह १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये तसेच अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Web Title: Farm Fights