शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

 नामवंत वादकांचा तबला घडविण्याचे ‘कसब’ खामगावात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 16:18 IST

एकेकाळी त्यांचा तबला घडविण्यासाठी जे हात मुंबईत राबायचे, तेच हात खामगाव परिसरातील तबले घडवताहेत. सगट बंधूंचे हे कसब सध्या खामगाव परिसरातील संगीतप्रेमी अनुभवत आहेत.

- देवेंद्र ठाकरेखामगाव : उस्ताद झाकीर हुसेन! तबला-वादन क्षेत्रातील एक जागतिक ख्यातीचं नाव. त्यांचा चेहरा समोर आला, की तबल्यावर नुसती भिंगरीसारखी फिरणारी बोटं आणि त्यातून निघणारा गोड आवाज, हे दृश्य समोर आल्याशिवाय राहत नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बोटांमध्ये जरी जादू असली, त्याला साथ आहे, तबला घडविणाऱ्या हातांची. एकेकाळी त्यांचा तबला घडविण्यासाठी जे हात मुंबईत राबायचे, तेच हात खामगाव परिसरातील तबले घडवताहेत. सगट बंधूंचे हे कसब सध्या खामगाव परिसरातील संगीतप्रेमी अनुभवत आहेत.गजानन सगट आणि जीवन सगट ही ती जोडी आहे. सगट बंधूंचे मूळ गाव चिखली तालुक्यातील गांगलगाव.सगट घराण्याची खरी ओळखच तबले घडविण्यामुळे निर्माण झाली. नारायण सगट, पुंडलिक सगट, मधुकर सगट आणि त्यानंतर गजानन व जीवन सगट ही चौथी पिढी तबल्याला बोलकं करण्याचं काम करीत आहेत. तबला बनविण्याचे कसब घरातच असल्याने साहजिकच हे दोघांमध्येही हा ‘हुन्नर’ उतरला. लहानपणापासूनच तबला तयार करण्याची किमया त्यांनी शिकली. यात अजून प्रगती झाली, ती मुंबई येथे व्हटकर गुरुजी यांच्याकडून धडे घेतल्यानंतर. परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे १९९६ साली सगट बंधूंची जोडी मुंबईत दाखल झाली. तिथे गुरुवर्य हरिदास व्हटकर यांच्याकडून त्यांनी हा गुण आणखी विकसित केला. त्या काळात उस्ताद झाकीर हुसेन, पंडित सुरेश तळवलकर, योगेश शम्सी, पंडित आनींदो चटर्जी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कलावंताचे तबले घडविण्याची संधी त्यांना मिळाली. अर्थात, यात व्हटकर गुरुजींचेच श्रेय असल्याचे ते सांगतात. काही वर्षे मुंबईत काढल्यानंतर व्हटकर गुरुजींनी स्वतंत्रपणे हे काम करण्याचे सांगितले. ‘तबला घडविण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात, आता अधिक शिकण्याची गरज नाही’, असा गुरुजींचा आशीर्वाद घेऊन ते खामगावात आले. येथे सुरुवातीला खविसंच्या जागेत विनाभाडेतत्त्वावर त्यांनी सहा वर्षे काम केले. चर्मवाद्याला बोलके करण्याची मेहनत, लगन, उपासना त्यांच्यात असल्याने त्यांच्या हातून घडलेला तबला दूरवर घुमू लागला. तबल्याचे ट्युनिंग महत्त्वाचे असते. त्यावर खूप मेहनत घ्यावी लागते. रक्ताचे पाणी केल्याशिवाय तबला बोलका होत नाही. चाट आणि लव यांचा योग्य मेळ बसला की खरा आनंद येतो. उच्च दर्जाचे साहित्य आणि पुडी बनविताना कुठल्याच गोष्टीची तडजोड आम्ही स्वीकारत नाही, असे सगट बंधू सांगतात. त्यांच्या या मेहनतीमुळेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच इतरही प्रांतातूनही तबले बनविण्यासाठी त्यांच्याकडे येतात. निव्वळ पैसा कमविणे, हा हेतू नसून ग्राहकांचे समाधान अधिक महत्त्वाचे असल्याने उत्तम खाल, शाई त्यासाठी वापरत असल्याचे सगट सांगतात. एकूण सगट काका-पुतणे जीव ओतून काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे झाकीर हुसेन यांच्या तबल्यासारखा बोल काढणारा तबला बनविण्याचा हुन्नर त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख बुलडाण्यात बनली आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावZakir Hussainझाकिर हुसैनcultureसांस्कृतिक