घराघरात तापाचे रुग्ण
By Admin | Updated: October 9, 2014 00:35 IST2014-10-09T00:35:14+5:302014-10-09T00:35:14+5:30
लोणार तालुक्यात अज्ञात तापाची साथ; मेहकर तालुक्यातील युवकांचा अज्ञात तापाने मृत्यू.

घराघरात तापाचे रुग्ण
कोयाळी दहातोंडे (लोणार, जि. बुलडाणा) : कोयाळी दहातोंडे व उदनापूर येथे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. येथील प्रत्येक घराघरात अज्ञात तापाने रुग्ण फणफणत असून, आरोग्य विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे परिसरात वाढती अस्वच्छता, मच्छरांचा उच्छाद व बदलते वातावरण अशा विविध कारणांमुळे साथीच्या आजाराने डोकेवर काढण्यास सुरूवात केली आहे. पाण्याचे स्त्रोत दूषित होऊन त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ, विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतात. सध्या कोयाळी दहातोंडे व उद्नापूर येथे घराघरात अज्ञात तापाचे रुग्ण आहेत. उद्नापूर येथील ऋषिकेश मुळे या ६ वर्षाच्या बालकाचा तापाने मृत्यू झाला असूनसुद्धा आरोग्य विभागाचे दुर्लक्षच दिसून येत आहे.
* युवकाचा मृत्यू
हिवराआश्रम (मेहकर, जि. बुलडाणा): अज्ञात तापाने येथील एका २४ वर्षीय युवकाचा उ पचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली. येथील आशीष गौतम जाधव (२४) हा विवेकानंद कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत होता. त्याला ताप आल्याने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; परंतु त्याची प्रकृती अत्यवस्थ होत असल्याने पुढील उ पचारार्थ त्याला अकोला येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान आशीषचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीसुद्धा आशीषच्या भावाचा रॅबिजमुळे मृत्यू झाला होता. गौतम जाधव यांना २ मुली व २ मुले असा परिवार होता.