बुलडाणा : तहसील कार्यालयाचे बनावट शासकीय शिक्के तयार करुन लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन बनावट प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एकास २५ मे रोजी १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. स्थानिक आनंद नगरमधील शेषराव चव्हाण (५४) याने बुलडाणा तहसील कार्यालयाचे बनावट शिक्के तयार केले. तसेच तहसीलदारांच्या खोट्या सह्या करुन बनावट प्रमाणपत्र वाटप केले. त्यापैकी शिंगणे यांचे अस्वच्छ व्यवसायाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे तत्कालिन तहसीलदार सुरेश बगळे यांच्या लक्षात आले. चौकशी केली असता शेषराव चव्हाण याने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नायब तहसीलदार नारायण रिंढे यांनी ३० जुलै २०१० रोजी शहर पोलिस स्टेशनध्ये फिर्याद नोंदवली होती. याप्रकरणी कलम ४६५, ४६८,४७१ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपासाअंती पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू महाले यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यांना गजानन मांटे यांनी सहकार्य केले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकाºयांनी शेषराव चव्हाण यास १८ महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सहाय्यक सरकारी वकील अनिलकूमार वर्मा यांनी सरकारी कामकाज पाहिले.
तहसीलदारांच्या खोट्या सह्या करुन बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यास १८ महिने सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:52 IST
बुलडाणा : तहसील कार्यालयाचे बनावट शासकीय शिक्के तयार करुन लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन बनावट प्रमाणपत्र वाटप केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एकास २५ मे रोजी १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
तहसीलदारांच्या खोट्या सह्या करुन बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यास १८ महिने सक्तमजुरी
ठळक मुद्देआनंद नगरमधील शेषराव चव्हाण (५४) याने बुलडाणा तहसील कार्यालयाचे बनावट शिक्के तयार केले. तसेच तहसीलदारांच्या खोट्या सह्या करुन बनावट प्रमाणपत्र वाटप केले.चौकशी केली असता शेषराव चव्हाण याने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले.