अतिरिक्त शिक्षकांचे वेतन रखडले

By Admin | Updated: November 22, 2014 01:31 IST2014-11-22T01:31:02+5:302014-11-22T01:31:02+5:30

बुलडाणा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ : समायोजन त्वरित करण्याची मागणी.

Extra teachers' salary stops | अतिरिक्त शिक्षकांचे वेतन रखडले

अतिरिक्त शिक्षकांचे वेतन रखडले

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा
न्यायालयीन तसेच विविध तांत्रिक कारणामुळे वर्‍हाडातील जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांचे समायोजन प्रलंबित झाल्याने अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांचे पगार काढण्यात आले नाहीत. त्यामुळे या शिक्षकांच्या कुटुंबांची उ पासमार होत आहे. अनेक शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन त्वरित करण्याची गरज आहे.
दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश संख्येनुसार शिक्षकांच्या नियुक्त्या होत असतात. त्यामुळे अनेक शिक्षकांचे दुसर्‍या ठिकाणी समायोजन करण्यात येते. परंतु शिक्षक समायोजन प्रक्रिया यावर्षी न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित करण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यात विविध तांत्रिक कारणामुळे शिक्षकांचे समायोजन करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेअंतर्गंत यावर्षी शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविण्यात आली. याप्रक्रियेनुसार रिक्त असलेल्या जागेवर पदोन्नतीव्दारे शिक्षकांचे सामायोजन करण्यात आले. परंतु या समायोजन प्रक्रियेवर न्यायालयीन स्थगिती आल्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी त्या शिक्षकांना पुन्हा पूर्वीच्या जागेवर काम करण्याच्या तोंडी सूचना दिल्या. अशा प्रकारे न्यायालयीन स्थगितीमुळे तसेच विविध तांत्रिक कारणामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ९0५ शिक्षक अतिरिक्त ठरले. तर अकोला व वाशिम जिल्ह्यात यावर्षी समायोजन प्रक्रिया न राबविल्यामुळे कमी प्रमाणात म्हणजे अकोला जिल्ह्यात जवळपास २१0 व वाशिम जिल्ह्यात २५0 शिक्षक अतिरिक्त ठरले. या परिस्थितीमुळे अ ितरिक्त शिक्षकांचे सष्टेंबर पर्यंत पगार काढावेत अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या होत्या. त्यानंतर शिक्षण विभागाच्या सचिवांनी पगार काढय़ाची मुदत डिसेंबरपर्यंत वाढविल्याचे पत्र दिले होते. परंतु अशा सूचना शिक्षणाधिकारी कार्यालयास मिळाल्या नसल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे पगार प्रलंबित आहेत. या अतिरिक्त शिक्षकापैकी अकोला व वाशिम जिल्ह्यातील काही अतिरिक्त शिक्षकांचे पगार लेखी काढण्यात येत आहेत. मात्र बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यातील ज्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन स्थगित करण्यात आले आहे. त्या अ ितरिक्त शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Extra teachers' salary stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.