योजनेला मुदतवाढ द्या : जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:37+5:302021-07-16T04:24:37+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१-२२साठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै होती. ...

योजनेला मुदतवाढ द्या : जाधव
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१-२२साठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै होती. जिल्ह्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पेरणीस सुरुवात झाली. परंतु नंतर पावसाचा खंड पडला. त्यामुळे पेरणी थांबली होती. सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर यंदा खरीप पेरणीचे नियोजन आहे. १० ते १४ जुलैदरम्यान समाधानकारक पाऊस पडल्यामुळे आता पुन्हा पेरणी सुरू झाली आहे. आतापर्यंत ८२ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यामध्ये खातेधारक शेतकरी ५ लाख ८७ हजार ८४८ असून, यापैकी १ लाख ६ हजार ४८५ शेतकऱ्यांनीच योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. लांबणीवर पडलेला खरिपाचा हंगाम पाहता पीक विमा योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी खा. जाधव यांनी केली आहे.