हिवरखेड पूर्णा येथे अवैध रेती उत्खनन
By Admin | Updated: July 5, 2014 23:45 IST2014-07-05T22:26:31+5:302014-07-05T23:45:47+5:30
पूर्णा येथील रेतीघाटातून राजरोस अवैध उत्खनन केले जात आहे.

हिवरखेड पूर्णा येथे अवैध रेती उत्खनन
सिंदखेडराजा : तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील रेतीघाटातून राजरोस अवैध उत्खनन केले जात आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
हिवरखेड पूर्णा येथील रेती घाटावरुन शासनाने १६ हजार ९६१ ब्रास रेती उपसा करण्याकरिता परवानगी दिलेली होती; परंतु आजपर्यंत अंदाजे २५ हजार ब्रास रेतीचा उपसा करण्यात आला आहे. रेतीघाट सोडून बाहेरील भागातसुद्धा अवैध उत्खनन केलेले आहे. दररोज अंदाजे ५0 ते १00 ट्रक आणि १00 ते १५0 ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक केली जाते.
या गाड्यांना ५ ब्रास ऐवजी ३ ब्रास आणि ३ ब्रास ऐवजी २ ब्रास एवढी पावती देऊन शासनाची दिशाभूल केली जात आहे. संबंधित कार्यालयाने मोजमाप केल्यावेळेस महसूल अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित लिलावधारकांनी बाहेरच्या कोणालाही मोजमाप करतेवेळी येण्यास मनाई केली होती. लिलावधारक नदीपात्रामध्ये जेसीबीच्या सहाय्याने लेवल करतात. त्यामुळे सदर मोजमाप पुन्हा करुन या रेतीघाटातून होत असलेली रेती उपसा वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी तढेगाव येथील बळीराम दराडे व शरद दराडे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.