नवजात बालिकेचा खून केल्याचे उघड
By Admin | Updated: May 26, 2017 20:23 IST2017-05-26T20:02:25+5:302017-05-26T20:23:56+5:30
मातेसह आजोबाविरुध्द गुन्हा दाखल

नवजात बालिकेचा खून केल्याचे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विधवा झालेल्या मुलीने जन्म दिलेल्या नवजात बालिकेचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाल्याने गुरुवारी जलंब पोलिसांनी मृत बालिकेचे आजोबा व आईविरुघ्द खुनाचा गुन्हा दाखल करुन आजोबास अटक केली आहे. ही घटना दादगाव येथे २२ मे रोजी घडली होती.
दादगाव येथील गोपाल तेलंग यांची विधवा झालेली मुलगी छाया मुकिंदा गवई हे २२ मे रोजी शेतात गेले असता छाया गवई हिने बालिकेस जन्म दिला होता. यानंतर नवजात बालिकेचा गोपाल तेलंग यांनी गळा आवळल्याने मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नवजात बालिकेत प्रेत नाल्यात पुरविण्यात आले होते. २३ मे नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आल्यानंतर याप्रकरणी जलंब पोलिसांनी कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान नवजात बालकाचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे याप्रकरणी मृत नवजात बालिकेचे आजोबा गोपाल तेलंग व आई छाया मुकिंदा गवई रा.दादगाव अशा दोघांविरुध्द कलम ३०२, २०१, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन गोपाल तेलंग यांना अटक केली आहे. तर छाया तेलंग यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणाचा तपास ठाणेदार बनसोडे करीत आहेत.