कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST2021-01-15T04:28:41+5:302021-01-15T04:28:41+5:30
अर्ज भरण्याच्या कामात शिक्षक व्यस्त बारावीच्या परीक्षा एप्रिल व दहावीच्या परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. आता १२ जानेवारीपासून ...

कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत
अर्ज भरण्याच्या कामात शिक्षक व्यस्त
बारावीच्या परीक्षा एप्रिल व दहावीच्या परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. आता १२ जानेवारीपासून दहावी आणि बारावीच्या बोर्डाचे परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये शिक्षकांचा भरपूर वेळ जात आहे. शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापनाची प्रक्रिया पूर्ण केली असून, या ऑनलाईन प्रक्रियेत झालेला अभ्यासकम शिक्षकांना शाळेत पुन्हा घ्यावा लागत आहे.
अध्यापनावर परिणाम
अध्यापनाबरोबरच शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेणे, प्रात्यक्षिके, बोर्डाची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, टिटोरियल, ऑनलाईन कामे यासारखी कामे पूर्ण करावी लागत असल्याने त्याचा परिणाम अध्यापनावर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासावरच अधिक भर द्यावा लागणार आहे.
दहावी व बारावीचा जो अभ्यासक्रम परीक्षेसाठी ठेवलेला आहे, तो आता जवळपास पूर्ण होत आलेला आहे. परंतु, यंदा दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी सराव परीक्षा देऊ शकले नाहीत. कमी वेळेत विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी करून घेण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत.
सुरेश हिवरकर, प्राचार्य शिवाजी शिक्षण संस्था लोणी गवळी.