जवळखेड येथे पोषण महाअभियान मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST2021-09-27T04:37:47+5:302021-09-27T04:37:47+5:30

अंगणवाडी जवळखेड बीड अंतर्गत एकूण सत्तावीस अंगणवाडी केंद्रे येतात. सप्टेंबर महिन्यामध्ये शासनाच्या पोषण महाअभियान मेळावा कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या एकात्मिक बाल ...

In the excitement of Poshan Maha Abhiyan Melawa at Jawalkhed | जवळखेड येथे पोषण महाअभियान मेळावा उत्साहात

जवळखेड येथे पोषण महाअभियान मेळावा उत्साहात

अंगणवाडी जवळखेड बीड अंतर्गत एकूण सत्तावीस अंगणवाडी केंद्रे येतात. सप्टेंबर महिन्यामध्ये शासनाच्या पोषण महाअभियान मेळावा कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ममता पवार जवळखेड बीडच्या पर्यवेक्षिका वर्षा धोत्रे यांनी महाअभियान मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यामध्ये गरोदर मातांसाठी देण्यात येणारा चौरस आहार, कुपोषित बालकांना देण्यात येणारा आहार यासंदर्भात मार्गदर्शनासोबत प्रथिने, कॅल्शियम, विटामिन सी आणि ए, खनिज, कार्बोहायड्रेड, प्रोटीनसह शरीर सुदृढ करण्यासाठी जो आहार देण्यात यावा याच्या संदर्भात वेगवेगळ्या पाककृतींच्या माध्यमातून उपस्थित गरोदर माता आणि स्तनदा माता यांना मार्गदर्शन केले. साथीच्या रोगांपासून कसा बचाव करावा यासंदर्भात डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथ रोगांपासून बचावासंदर्भात पर्यवेक्षिका वर्षा धोत्रे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ममता पवार या होत्या तसेच बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका, किशोरवयीन मुली कुमारी वैष्णवी तिडके, पूजा वाहुळ, कोमल जाधव, शिवानी उजाड, पायल सोरमारे आदी किशोरवयीन मुलींसह, बीटमधील स्तनदा माता, गरोदर माता आणि इतर महिलांची उपस्थिती होती.

Web Title: In the excitement of Poshan Maha Abhiyan Melawa at Jawalkhed