मृत अर्भक आढल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 20:40 IST2017-10-01T20:39:09+5:302017-10-01T20:40:59+5:30

चिखली : स्थानिक महाबिज कार्यालयाजवळ अंदाजे दोन दिवसांचे पुरूष जातीचे मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

The excitement of the dead infant found | मृत अर्भक आढल्याने खळबळ

मृत अर्भक आढल्याने खळबळ

ठळक मुद्देमहाबिज कार्यालयाजवळ आढळले बालकअर्भक अंदाजे दोन दिवसांचे पुरूष जातीचे 

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : स्थानिक महाबिज कार्यालयाजवळ अंदाजे दोन दिवसांचे पुरूष जातीचे मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 
चिखली-देऊळगावराजा रोडवरील महाबिज कार्यालयानजीक १ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रस्त्यापासून थोड्या अंतरावर गवतात पुरूष जातीचे मृत अर्भक रस्त्याने जाणाºया नागरीकांना आढळले त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता घटनास्थळी दाखल झालेल्या पीएसआय गायकवाड यांच्यासह कर्मचाºयांनी पंचनामा केल्यानंतर सदर मृत अर्भक स्थानिक ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. दरम्यान खामगाव येथील घटनेची शाई वाळते न वाळते तर शहरात ही घटना घडल्याने शंकाकुशंकांचे पेव फुटले असून पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.

Web Title: The excitement of the dead infant found