ड्रायव्हिंग लायसन्ससाठी रविवारी सारथीवर होणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:13+5:302021-09-23T04:39:13+5:30
बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून येत्या रविवारी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षार्थींची नोंदणी करण्यात आली आहे. वाहन चालविण्याचे पक्के ...

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी रविवारी सारथीवर होणार परीक्षा
बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून येत्या रविवारी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षार्थींची नोंदणी करण्यात आली आहे. वाहन चालविण्याचे पक्के लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना रविवारीही परीक्षा देता येईल. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी परिवहन विभागाने हा निर्णय घेतला. अर्जदारांना घरबसल्या मोबाईलद्वारे शिकाऊ वाहन परवाना काढता येईल. याच धर्तीवर राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना रविवारी पक्क्या लायसन्ससाठीची परीक्षा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. सुटीच्या दिवशीही आता कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
३० सप्टेंबरपर्यंतच आहे अखरेची मुदत
कोरोनामुळे शिकाऊ लायसन्सला दिलेली मुदतवाढ व फेसलेस प्रणालीमुळे लायसन्सची चाचणी देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी वेळ मिळण्यास अडचणी येत होती. शिकाऊ अनुज्ञप्तीधारकांनी शिकाऊ अनुज्ञप्तीची मर्यादा संपुष्टात येण्याअगोदर त्यांची पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी होणे अनिवार्य असल्याने आरटीओ कार्यालयातर्फे सप्टेंबर २०२१ अखेरपर्यंत पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीकरिता सुटीच्या दिवशी म्हणजेच रविवारी कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व शिकाऊ अनुज्ञप्तीधारकांनी वाहन परवाना चाचणीकरिता सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू असल्याने पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीकरिता ऑनलाइन नोंदणी करावी. पेपरलेस प्रणालीचा वापर करावा. सुटीच्या दिवशी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित राहतील. जेणेकरून वाहनचालकांची गैरसाेय हाेणार नाही.
-गोपाल वरोकार, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.