विहिरीत पडून माजी सैनिकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 25, 2014 00:02 IST2014-06-24T23:11:48+5:302014-06-25T00:02:15+5:30
मोताळा तालुक्यातील खरबडी येथे विहिरीत पडून माजी सैनिकाचा मृत्यू.

विहिरीत पडून माजी सैनिकाचा मृत्यू
मोताळा : तालुक्यातील खरबडी येथे विहिरीत पडून माजी सैनिकाचा काशीनाथ किसन निकाळजे वय ६0 यांचा मृत्यू झाल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. ते जामनेर तालुक्यातील गोरनाळा येथील मूळ रहिवासी असून २३ जून रोजी ते पत्नीसह खरबडी येथे मुलाकडे आले होते. आज सकाळी ते बाहेर पडले. बराच वेळ झाल्यावर परत न आल्यामुळे शोधा-शोध केली असता. स्मशानभूमीजवळील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.