राममंदिरासाठी सर्वांनी आपला खारीचा वाटा द्यावा : भिवगांवकर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST2021-01-15T04:29:17+5:302021-01-15T04:29:17+5:30
स्थानिक बालाजी गल्ली येथील वरद कॉम्प्लेक्समध्ये श्री राममंदिर निधी संकलन कार्यालय सुरू करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गजानन ...

राममंदिरासाठी सर्वांनी आपला खारीचा वाटा द्यावा : भिवगांवकर महाराज
स्थानिक बालाजी गल्ली येथील वरद कॉम्प्लेक्समध्ये श्री राममंदिर निधी संकलन कार्यालय सुरू करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गजानन महाराज भिवगांवकर होते. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर होते. अभियानाचे सहप्रमुख उत्तम महाराज वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक वाघमारे महाराज यांनी केले. त्यानंतर राजू मेहेत्रे यांनी अभियान गीत सादर केले. शांतीलाल बोराळकर यांनी संपूर्ण अभियानाचे स्वरूप मांडले. महाअभियान कोणत्याही जाती, धर्म, गरीब, श्रीमंत यांचे नसून सर्व रामभक्तांचे आहे. यात कोणताही भेद मनात न ठेवता सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन ऐतिहासिक राष्ट्रमंदिराच्या बांधणीत आपण गावागावात, वस्ती-मोहल्ल्यापर्यंतच्या रामभक्तांपर्यंत पोहोचवायचे आहे, असे सांगून अभियानाद्वारे आपण या पर्वाचे साक्षीदार बनायचे आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी तालुका व नगरातील असंख्य रामभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ॲड. गजानन कोरडे यांनी केले, तर आभार प्रशांत मापारी यांनी मानले.