अखेर कापूस खरेदी सुरु

By Admin | Updated: November 16, 2014 00:02 IST2014-11-16T00:02:50+5:302014-11-16T00:02:50+5:30

देऊळगाव राजात काटा पूजन, जळगाव जामोद येथे दोन ठिकाणी खरेदी.

Eventually started buying cotton | अखेर कापूस खरेदी सुरु

अखेर कापूस खरेदी सुरु

जळगाव जामोद (बुलडाणा) : कापूस पणन महासंघाच्यावतीने १५ नोव्हेंबरला कापूस खरेदीचा मुहूर्त करण्यात आला. देऊळगाव राजामध्ये मुहूर्ताला १ किलोही कापूस आला नाही. केवळ काटापूजन झाले; मात्र जळगाव जामोद येथे दोन जिनिंग प्रेसिंगमध्ये कापूस खरेदी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १९ िक्वंटल १५ किलो कापूस खरेदी करण्यात आला आहे. सुनगाव येथील श्री कोटेक्स जिनिंगमध्ये शेतकरी पुंडलिक पंढरी पाटील यांचा ६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. यावेळी शेतकर्‍याला ४0५0 रुपये प्रति िक्वंटल भाव देण्यात आला व शेतकरी पाटील यांचा शाल, टोपी व श्रीफळ देऊन आ.डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार झाला व त्यानंतर आ. कुटे यांनी काटा पूजन केले. तर सुपो जिनिंगमध्ये गोपाळ भास्कर खुपसे रा. धानोरा महासिद्ध आणि रघुनाथ ज्ञानदेव सुरपाटणे रा. धानोरा महासिद्ध या दोन शेतकर्‍यांकडून १३ िक्वंटल १५ किलो कापूस ४0५0 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला. याप्रसंगी पणन महासंघ संचालक प्रसेनजित पाटील आणि खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्याहस्ते दोन शेतकर्‍यांना शेला, टोपी व नारळ देऊन सन्मानित करण्यात आले, तर डॉ. किशोर केला यांच्या हस्ते मापारी यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Eventually started buying cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.