शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही वैशाख पौर्णिमेला वन्यप्राणी गणना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 10:40 IST

Wildlife census : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाच्या वर्षीही गणना रद्द करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपूर : दरवर्षी वैशाख पौर्णिमेला होणारी पक्षी व वन्यप्राणी गणना सलग दुसऱ्या वर्षीही होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाच्या वर्षीही गणना रद्द करण्यात आली आहे. यामुळे पक्षी व प्राणिप्रेमींची निराशा झाली आहे.वन्यजीव संवर्धन कार्यात अधिकाधिक लोकसहभाग मिळावा यासाठी वन्यजीवप्रेमींनाही गणनेमध्ये सहभागी करून घेतले जाते. भारतातील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या किती हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्यप्राणी गणना सुरू केली होती. त्यासाठी पाणवठ्याशेजारी मचाण उभारून त्यावरून वन्यजिवांचे निरीक्षण करण्यात येते. ते वन्यजीवप्रेमींना अभ्यासासाठी महत्त्वाची मानली जाते. या उपक्रमातून पक्षी, प्राणी व पर्यावरणाबाबतचे ज्ञान मिळते. यात स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट केले जाते. वैशाख पौर्णिमेला दुपारी गणनेस सुरुवात होते, तर दुसऱ्या दिवशी दुपारी गणना संपविली जाते.केंद्र सरकारने २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते, तर ७ मे २०२० रोजी वैशाख पौर्णिमा होती.त्यामुळे २०२० मध्ये गणना झाली नव्हती. यंदाच्या वर्षी लॉकडाऊन असल्याने २६ मे रोजी असणाऱ्या वैशाख पौर्णिमेदिवशी आयोजित करण्यात आलेली गणना रद्द केली आहे. 

गणना वैशाख पौर्णिमेलाच का ? वैशाख पौणिमेच्या दिवशी चंद्राची कक्षा पृथ्वीच्या जवळ असते. चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडत असतो. त्यामुळे पक्षी व प्राणी सहज दिसून येतात. मे महिन्यात झाडांची पाने गळालेली असतात. त्यामुळे लांबपर्यंतचे प्राणी मचाणावरून दिसतात. त्यांच्या नोंदी घेऊन त्यांना ओळखणे सोपे जाते. तसेच या नोंदीवरून वनविभागास आपल्या क्षेत्रातील प्राण्यांची माहिती मिळाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सुलभ होते. यासाठी वैशाख पौणिमेदिवशी प्राणी व पक्ष्यांच्या नोंदी केल्या जातात. 

महाराष्ट्र शासनाने यंदाच्या वर्षीही वैशाख पौर्णिमा दिवशी गणना करण्यास मनाई केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी कोरोना पूर्णपणे नष्ट होऊन गणना करण्याची संधी प्राणी व पक्षिप्रेमींना मिळेल, अशी अपेक्षा आहे.सुहास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोनाळा

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरforestजंगलwildlifeवन्यजीव