सलग सुट्यांनंतरही अनेक कर्मचारी लेटलतीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST2020-12-29T04:33:19+5:302020-12-29T04:33:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गत आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या असल्यानंतरही साेमवारी अनेक कर्मचारी उशिराने कार्यालयात दाखल झाले. ...

Even after consecutive holidays, many employees are late | सलग सुट्यांनंतरही अनेक कर्मचारी लेटलतीफ

सलग सुट्यांनंतरही अनेक कर्मचारी लेटलतीफ

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : गत आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या असल्यानंतरही साेमवारी अनेक कर्मचारी उशिराने कार्यालयात दाखल झाले. उशिरा आल्यानंतरही अनेकांनी कार्यालयाच्या आवारात गप्पा मारण्यात धन्यता मानल्याचे चित्र ‘लाेकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले.

२५ डिसेंबर राेजी ख्रिसमस असल्याने तसेच चाैथा शनिवार आणि रविवार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस सुट्या मिळाल्या. त्यानंतर २८ डिसेंबर राेजी सलग सुट्या मिळाल्यानंतरही बहुतांश विभागात सकाळी १० वाजता एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ १० वाजेची असली तरी अनेक जण आपल्या सवडीनुसार कार्यालयात दाखल हाेत असल्याचे चित्र साेमवारी जिल्हा परिषदेत हाेते. अर्थ विभाग, आराेग्य विभाग व इतर विभागात सकाळी १० वाजता फेरफटका मारला असता, केवळ सफाइ कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळले. काही कर्मचारी कार्यालयात आले असले तरी टेबलवर बसण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. जिल्हा परिषद कार्यालयाच्या माेकळ्या मैदानात कर्मचारी गप्पा मारताना आढळले. काेराेनामुळे थंब मशीन बंद आहे. याचा पुरेपूर लाभ कर्मचारी घेत आहेत. शिवाय मस्टरवर स्वाक्षरी केल्यानंतर अनेक जण १५ ते २० मिनिटे चहा टपरी व इतर ठिकाणी वेळ मारून नेत असल्याचे चित्र असते. कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे नियंत्रणच नसल्याने असे प्रकार घडत आहेत.

अधिकारीही लेटलतीफ

जिल्हा परिषदेतही बहुतांश अधिकारी १० वाजता कार्यालयात येतच नसल्याचे चित्र आहे. अधिकारीच येत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कुणाचेही दडपण राहत नाही. त्यामुळे बहुतांश विभागातील कर्मचारी कार्यालयात उशिरा येतात, कामेही उशिरा सुरू करीत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कारवाई काेण करणार?

सलग तीन दिवसांच्या सुट्या आल्याने अनेक अधिकाऱ्यांनी साेमवारची सुटी टाकली आहे. अधिकारीच वेळेवर उपस्थित राहत नसल्याने लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई काेण करणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Even after consecutive holidays, many employees are late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.