धामणगाव बढे येथे लाेकसहभागातून विलगीकरण कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST2021-05-10T04:34:47+5:302021-05-10T04:34:47+5:30

धामणगाव बढे : ग्रामीण भागात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना त्याला प्रतिबंध करण्यासाठी शासन-प्रशासन यांच्या प्रयत्नांसोबतच लोकजागरूकता ...

Establishment of separation cell at Dhamangaon Badhe | धामणगाव बढे येथे लाेकसहभागातून विलगीकरण कक्ष स्थापन

धामणगाव बढे येथे लाेकसहभागातून विलगीकरण कक्ष स्थापन

धामणगाव बढे : ग्रामीण भागात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना त्याला प्रतिबंध करण्यासाठी शासन-प्रशासन यांच्या प्रयत्नांसोबतच लोकजागरूकता व लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन मोताळा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले.

धामणगाव बढे येथील सहकार विद्यामंदिर येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तथा लोकसहभागातून विलगीकरण कक्षाचे उद्घाटन ८ मे रोजी त्यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते.

विलगीकरण कक्षासाठी दातृत्वाचे पालकत्व घेणाऱ्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तसेच असे विलगीकरण कक्ष गावागावांत उभे करण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात प्रामुख्याने ठाणेदार चंद्रकांत ममताबादे, जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड गणेशसिंग राजपूत, ॲड. जयश्री शेळके, ,निरंजन वाढे, रविशंकर मोदे, अलीम कुरेशी, उपसरपंच श्याम निमखेडे, ग्रामपंचायत सदस्य रशीद पटेल वैद्यकीय अधिकारी डॉ़ सतीश नारखेडे, ग्रामसेवक मोरे, तलाठी प्रियंका राठोड यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य ॲड. वसीम कुरेशी यांनी केले. सदर विलगीकरण कक्षात असणाऱ्या रुग्णांवर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ़ सतीश नारखेडे व त्यांची टीम लक्ष ठेवून असेल. सिंदखेड येथे सुमारे दीड वर्षापासून गावकऱ्यांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावाबाहेर विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केलेला गावकऱ्यांसाठीचा तो जिल्ह्यातील पहिला विलगीकरण कक्ष होता. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या या विलगीकरण कक्षाचा सिंदखेडवासीयांना मोठा फायदा झाला आहे. गावामध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यात त्यामुळे यश मिळाले. आजसुद्धा गावकऱ्यांसाठी विलगीकरण कक्षाची सोय ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेली आहे.

Web Title: Establishment of separation cell at Dhamangaon Badhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.