शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शंकांचे निरसन करण्यास ‘ईएसआयसी’कडून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 11:35 AM

ESIC Avoid to resolving doubts शंकांचे निरसन करायचे तरी कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

-  योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्थानिक ईएसआयसी कार्यालयात टाळाटाळ करण्यात येते. यासंदर्भात माहितीचे अधिकार नागपूर कार्यालयाला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, नागपूर येथील ईएसआयसी कार्यालयातील दुरध्वनी सतत व्यस्त येत असून संपर्क न होऊ शकल्याने आपल्या शंकांचे निरसन करायचे तरी कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्यासाठी ईएसआयसी कार्यालय शासकीय स्तरावर कार्यरत आहेत. याकरिता विदर्भात नागपूर या मुख्य कार्यालयांतर्गत जिल्हास्तरीय कार्यालय सुरू आहेत. या कार्यालयात खासगी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांच्या लाभासाठी कागदपत्रे स्वीकारण्यात येतात. यासंदर्भातील माहितीही या कार्यालयात उपलब्ध आहे. मात्र, या योजनेविषयी इतर महत्त्वाची माहिती किंवा आकडेवारी हवी असल्यास या कार्यालयातून दिल्या जात नाही. याकरिता नागपूर येथील ईएसआयसी या मुख्य कार्यालयाचा दुरध्वनी नंबर ऑनलाइन प्राप्त करून घेण्याच्या सूचना देण्यात येतात. प्रत्यक्षात मात्र या ऑनलाइन संकेतस्थळावर दर्शविण्यात आलेला लँडलाइन नंबर सतत व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध योजनांच्या लाभार्थींना योग्य ते मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त ठरते. वरिष्ठ कार्यालयात संपर्क होत नसेल तर संबंधित लाभार्थ्याला स्थानिक कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती स्थानिक कार्यालयातच उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. नेमके हेच मार्गदर्शन स्थानिक पातळीवर करण्यात येत नसल्याने लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रधानमंत्री अटल बिमीत कल्याण योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी आम्हाला स्थानिक पातळीवरून देता येत नाही. याकरिता नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. या कार्यालयाचा लँडलाइन क्रमांक ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध आहे.- विवेक शेगावकर, अधिकारी, ईएसआयसी कार्यालय, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव