निरिक्षकांसह चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच क्वारंटीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 06:48 PM2020-07-23T18:48:15+5:302020-07-24T11:06:25+5:30

पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या निरिक्षकांसह चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.

The entire police station is quarantined | निरिक्षकांसह चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच क्वारंटीन

निरिक्षकांसह चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच क्वारंटीन

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: कोरोना विषाणू संक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन चर्चेत आले आहे. दरम्यान, पोलिस स्टेशनमधील ४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.  त्यामुळे निरिक्षकांसह १९ कर्मचारी क्वारंटीन करण्यात आले. त्यामुळे पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन आता शिवाजी नगर पोलिस स्टेशनशी जोडण्यात आले. पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या निरिक्षकांसह चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.  त्यानंतर पोलिस स्टेशनमधील कर्मचाºयांचे कुटुंबिय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  पोलिस स्टेशनमधील (१९) आणि पोलिसांच्या हायरिक्स संपर्कातील तब्बल २६ जणांना क्वारंटीन करण्यात आले. दरम्यान, कोरोना आपत्तीमुळे  पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचा संपूर्ण कारभार विस्कळीत झाला. कोरोना विषाणू संक्रमणाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना पोलिसच कोरोना संक्रमणाला बळी पडताहेत.

पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनमधील ठाणेदार, लेखनिस, बीट पोलिस आणि त्याच्या परिवारातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यामुळे संपूर्ण पोलिस स्टेशन सील करण्यात आले. त्यानंतर हे पोलिस स्टेशन खामगाव येथील शिवाजी नगर पोलिस स्टेशनशी जोडण्यात आले.

पोलिस कर्मचाºयांसोबतच त्यांचे कुटुंबियही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. पोलिस स्टेशनमधील सर्वच कर्मचारी क्वारंटीन असल्याने सदर पोलिस स्टेशन शिवाजी नगर पोलिस स्टेशनशी जोडण्यात आले. - प्रदीप पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी, खामगाव.

Web Title: The entire police station is quarantined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.