अतिक्रमण भोवले;जामोद ग्रामपंचायत सदस्य अपात्र

By Admin | Updated: May 19, 2014 00:36 IST2014-05-18T23:52:09+5:302014-05-19T00:36:01+5:30

जामोद येथील ग्रामपंचायत सदस्याने शासकीय जमीनीवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामपंचायत सदस्य अपात्र.

Encroachment Bhole; Jamod Gram Panchayat members ineligible | अतिक्रमण भोवले;जामोद ग्रामपंचायत सदस्य अपात्र

अतिक्रमण भोवले;जामोद ग्रामपंचायत सदस्य अपात्र

जळगाव जामोद : जामोद येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्र.४ मधून शे.तसलीम शे.कादर हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. शे.तसलीम ह्यांनी शासकीय जमिनीवर म्हणजेच पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीवर अतिक्रमण केलेले आहे. त्या बाबतची तक्रार गावातील मो.याकुश शेख तसलीम ह्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१)(ज ३) नुसार अप्पर जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांच्याकडे दाखल केला होता. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी ह्यांनी प्रकरणात २८ नोव्हेंबर १३ रोजी मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसचिव यांचा संयुक्त अहवाल मागविण्यात आला. त्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायत सदस्य शे.तसलीम शे.कादर ह्यांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी ह्यांनी मो.याकुब शेख यांचा अर्ज मंजूर करुन ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१) ज ३ नुसार ६ मे रोजी शेख तसलीम शेख कादर ह्यांना अपात्र घोषित केले आहे.

Web Title: Encroachment Bhole; Jamod Gram Panchayat members ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.