अतिक्रमणधारकांना मिळणार घरकुल
By Admin | Updated: November 6, 2014 23:16 IST2014-11-06T23:16:31+5:302014-11-06T23:16:31+5:30
लोणार सरोवर परिसरातील अतिक्रमकांना ३३४ घरकुले.

अतिक्रमणधारकांना मिळणार घरकुल
मयूर गोलेच्छा / लोणार
जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे प्रदूषण रोखण्यासाठी नगर परिषदेच्या पुढाकारातून अ ितक्रमणधारकांसाठीचे ३३४ घरकुले पूर्ण झालेली असून, त्यांना लवकरच या घरात प्रवेश मिळणार आहे.
लोणार सरोवराला लागून असलेल्या अतिक्रमणधारकांना स्थलांतरीत करण्यासाठी नगर पालिकेच्या पुढाकारातून सन २00८ मध्ये १७ कोटी ८४ लाख २९ हजार रुपयाच्या निधीतून ७00 नागरिकांना एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत अनुसूचित जा तीच्या २६२, अनुसूचित जमातीच्या ६, कोळी ७0, इतर ३६२ कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातीसाठी ७५00, इतरांसाठी १२ हजार लाभार्थी हिस्सा घेतल्या जाणार आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील ३३४ घरकुले पूर्णत्वास गेली असून, विद्युत व जलवितरणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सरोवर परिसरातील अतिक्रमणधारकांना आता अडगळीत न राहता मोकळ्या हवेचा श्वास मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील ७00 घरकुलापैकी ३00 घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४00 घरकुलांसाठी जागेची कमतरता असल्यामुळे घरकुलांचे काम करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कंत्राटदाराकडून होत आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या या वसाहतीत अ ितक्रमणधारकांसाठी सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या असून, यामध्ये प्रशस्त व्यावसायिक गाळे, दवाखाना, मंगल कार्यालय, कम्युनिकेशन सेंटर इत्यादींचा समावेश आहे. नगर परिषदेच्या या घरकुल उपक्रमामुळे अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला आहे.