कर्मचा-यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावावा
By Admin | Updated: October 5, 2014 00:59 IST2014-10-05T00:49:00+5:302014-10-05T00:59:59+5:30
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अवाहन.

कर्मचा-यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावावा
खामगाव (बुलडाणा) : इतर मतदारसंघातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना, मतदान कार्यासाठी कर्मचारी म्हणून वेगळ्या मतदान केंदावर नियुक्त केले असल्यास अशा कर्मचार्यांनी ट पाली मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मतपत्रिके करिता निवडणूक कार्य प्रमाणपत्र घेण्याकरिता ईडीसी फार्म, नमूना १२ अ, नियुक्ती आदेश, ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रतिसह अचुकरित्या भरुन संबंधित नायब तहसीलदार किंवा नोडल ऑफीसर यांच्याकडे द्यावेत तसेच ज्या कर्मचार्यांचे नाव याच मतदार संघातील गावाच्या यादीत असेल तर अशा कर्मचार्यांनी फार्म नमुना १२ प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन खामगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.