महाजल योजनेत अपहार

By Admin | Updated: July 2, 2014 23:46 IST2014-07-02T23:22:18+5:302014-07-02T23:46:01+5:30

लोणार तालुक्यातील सोनुना येथील महाजल योजनेत अपहार; निकृष्ट दर्जाचे काम

Empire in the Mahajal Yojana | महाजल योजनेत अपहार

महाजल योजनेत अपहार

लोणार : तालुक्यातील सोनुना येथील गावकर्‍यांना पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये याकरीता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून महाजल योजनेअंतर्गत केलेल्या कामामध्ये स्थानिक पाणी पुरवठा समितीचे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार केला. यामुळे २00७ पासून सोनुना या ठिकाणी महाजल योजनेतून थेंबभर पाणीही गावकर्‍यांच्या नळाला आले नाही.
लोणार तालुक्यातील गटग्रामपंचायत असलेल्या शिवणी जाट व सोनुना यापैकी सोनुना येथे २00७ पासून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ लक्ष रुपये किमतीच्या महाजल योजनेचे काम सुरु झाले. मात्र योजनेच्या कामाच्या तपासणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांसमोर पाणीपुरवठा समिती अध्यक्ष आणि सचिवाने दुसर्‍या विहिरीवरुन टाकीत पाणी भरुन अधिकार्‍यांची दिशाभुल केली. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे २00७ पासून योजनेतून गावकर्‍यांना पाणीपुरवठा झालेला नाही. यामुळे गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाजल योजनेच्या कामाची संपूर्ण माहिती असलेले कागदपत्रे व महत्वपूर्ण दस्ताऐवज समितीच्या अध्यक्ष सचिवांनी ग्रामपंचायतला सादर केले नाही. योजनेचे दस्ताऐवज ग्रामपंचायत, उपविभागीय कार्यालय मेहकर, कार्यकारी अभियंता यांच्याकडेही उपलब्ध नाही. सोनुना येथील महाजल योजनेत संगनमताने भ्रष्टाचार करणार्‍या अधिकार्‍यांसह पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्ष सचिवावर कागदपत्रे सादर न केल्याप्रकरणी सोनुना ग्रामपंचायतचे सचिव करवते यांनी लोणार पोस्टेमध्ये तक्रार दिली आहे. याबाबात ३ जुलै रोजी आयोजित डिपीडीसी बैठकीत खा.प्रतापराव जाधव आणि आ.डॉ.संजय रायमुलकर सोनुना येथील पाणीपुरवठा योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराबाबत काय भुमिका घेतात. याकडे सोनुनावासियांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Empire in the Mahajal Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.