ग्रामपंचायत निवडणुकीत डिजिटल प्रचारावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST2021-01-13T05:31:06+5:302021-01-13T05:31:06+5:30

साखरखेर्डा : साखरखेर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच रंगत आली असून, आपण पाच वर्षांत काय कामे केली, याचा हिशेब ...

Emphasis on digital campaigning in Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीत डिजिटल प्रचारावर भर

ग्रामपंचायत निवडणुकीत डिजिटल प्रचारावर भर

साखरखेर्डा : साखरखेर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच रंगत आली असून, आपण पाच वर्षांत काय कामे केली, याचा हिशेब डिजिटल प्रचार यंत्रणेद्वारे मांडल्या जात आहे. साखरखेर्डा ग्रामपंचायतच्या १७ जागांसाठी ही निवडणूक हाेणार आहे. त्यासाठी ११ हजार ६५६ मतदार मतदान करणार आहे. नगर पंचायतपेक्षा जास्त लोकसंख्या आणि मतदार संख्या असूनही ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. ग्रामपंचायतीला मिळणारा निधी आणि स्थानिक आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य यांची सक्षम साथ असली की गावाचा चेहरामोहरा बदलला जाऊ शकतो याची प्रत्यक्ष साक्षीदार ग्रामपंचायतच असते. सगळा गोतावळा सोबत असताना कामाची आखणी केली नाही तर गाव तेवढेच भकासही दिसू लागले, याचा अनुभव प्रत्येक गावातील मतदारांना आला आहे. आज गाव विकासासाठी पोपटराव पवार, अण्णा हजारे यांच्या गावचे उदाहरण दिले जाते. खरे तर आपणही गावाचा विकास करू शकतो ही इच्छाशक्ती प्रत्येक होणाऱ्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या मनात असावी लागते. गाव विकासासाठी तळमळ असणारा व्यक्ती कोण याचा शोध मतदारांना सदस्य निवडताना करावा लागणार आहे. ४३ गावात डिजिटल बॅनरने जागा व्यापली आहे. साखरखेर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत तर विकास कामे काय केली हे डिजिटल व्हॅन लावून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ढाबे, हाॅटेलांवर गर्दी वाढली आहे. १५ जानेवारीपर्यंत कार्यकर्त्यांची चंगळ आहे. २५ टक्के मतदारच दरवेळी निर्णायक ठरत असतात.

Web Title: Emphasis on digital campaigning in Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.