मुलं खेळायला गेल्याच्या कारणावरून भावकित हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST2021-02-08T04:30:33+5:302021-02-08T04:30:33+5:30

देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव येथील गोरखनाथ आंबादास बरडे हे जालना येथे खासगी कंपनीत नोकरीला आहेत ते परिवारासह गोळेगव येथे ...

Emotional fights over the reason the kids went to play | मुलं खेळायला गेल्याच्या कारणावरून भावकित हाणामारी

मुलं खेळायला गेल्याच्या कारणावरून भावकित हाणामारी

देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव येथील गोरखनाथ आंबादास बरडे हे जालना येथे खासगी कंपनीत नोकरीला आहेत ते परिवारासह गोळेगव येथे राहतात. शनिवारी दुपारी चार वाजता त्यांचे पुतणे हरिओम व आराध्या हे शेजारीच असलेल्या पंढरीनाथ सखाराम बरडे यांच्या शेतात गेले याचा राग धरून सखाराम दौलत बरडे, पंढरीनाथ सखाराम बरडे, शक्तिनाथ उर्फ बबन पंढरीनाथ बरडे, कृष्णा पंढरीनाथ बरडे, मालसाबई सखाराम बरडे, शांताबाई पंढरीनाथ बरडे, शीतल व सोनू पंढरीनाथ बरडे यांनी गोरखनाथ यांच्या घरी जाऊन गोरखनाथ व त्यांचे वडील आंबादास यांना कोयत्याने मारहाण केली. याप्रकरणी गोरखनाथ बरडे यांच्या फिर्यादी वरून सिंदखेड राजा पोलिसांनी उपराेक्त व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दुसरीकडे याच भांडणाच्या कारणावरून शक्तिनाथ उर्फ बबन पंढरीनाथ बरडे यांनीही रविवारी सिंदखेडराजा पोलिसांत फिर्याद दिली असून, गोरखनाथ बरडे, नवनाथ आंबादास बरडे, आंबादास बरडे, अशोक रंगनाथ बरडे, विष्णु अशोक बरडे, मंदाबई आंबादास, अश्विनी रंगनाथ यांनी माझे वडील, भाऊ व आजी यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपराेक्त सात जणांविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Emotional fights over the reason the kids went to play