शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे: प्रादेशिक संचालकांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 14:40 IST

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे नियमितपणे करण्यासोबतच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले.महावितरणच्या बुलडाणा जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गुुरुवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीनंतर डोणगाव सबस्टेशनला आकस्मिक भेट देत पूर्ण पाहणीअंती देखभाल व दुरुस्तीच्या त्रुटी दूर करण्याकरिता उपाययोजना सुचविल्या. तसेच त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. वीज ग्राहकांना योग्य व तत्पर सेवा देणे, त्यांच्यासोबत सौजन्याने वागणे, त्यांच्या तक्रारी ऐकून त्यांचे त्वरीत निराकरण करणे, त्यांच्या फोनला योग्य प्रतिसाद देण्याबाबतही दिलीप गुगल यांनी मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी आठवड्यातून दोन दिवस उपविभागीय कार्यालये आणि शाखा कार्यालयात भेटी देत तेथील बिलिंग, अखंडित वीज पुरवठा आणि उपकेंद्रातून होणाºया ट्रीपिंगचा आढावा घेत त्याची नोंद मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेतले जात असल्याचे सुनिश्चित करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीला अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा राहुल बोरीकर, विशाल पिपरे यांच्यासह अधिकारी हजर होते.  

तक्रारींच्या निराकरणासाठी मेळाव्याचे आयोजनबुलडाणा मंडलांतर्गत असलेल्या उपविभागीय कार्यालये स्तरावर ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी १५ जुलै ते ५ आॅगस्ट दरम्यान मेळावे घेण्याच्या सूचनाही प्रादेशिक संचालकांनी दिल्या.नवीन वीज पुरवठा घेण्याकरिता पैशाचा भरणा करूनही प्रलंबित असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना प्राधान्याने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

लोकप्रतिनिधींना द्यावी कामाची माहितीउच्चदाब वितरण प्रणाली व सौर कृषीपंप योजनेबाबत ग्राहकांना कार्यालयीन स्तरावर योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे. ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यातही याबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासोबतच महावितरणच्या कामकाजाची, प्रगतीची व काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण