वीज वितरण कंपनीने केली १८ कोटींची वसुली
By Admin | Updated: May 22, 2014 23:41 IST2014-05-22T22:59:25+5:302014-05-22T23:41:37+5:30
खामगांव उपविभागीय कार्यालय अंतर्गत ५ तालुक्यात वीज वितरण कंपनीने १८ कोटी ४0 लाख ५१ हजार रुपयांची देयक वसुली केली आहे.

वीज वितरण कंपनीने केली १८ कोटींची वसुली
खामगाव : शहर भारनियमनमुक्त होण्यासाठी महावितरण कंपनी कडून मार्च महिन्यापासून वसुली काटेकोरपणे सुरु आहे. त्यामुळेच खामगांव उपविभागीय कार्यालय अंतर्गत ५ तालुक्यात वीज वितरण कंपनीने १८ कोटी ४0 लाख ५१ हजार रुपयांची देयक वसुली केली आहे. यामध्ये खामगाव शहरातील गत तीन महिन्यातील वसुली ६ कोटी २0 लाख ३९ हजार रुपये आहे. या वसुलीमुळेच खामगाव शहर ह्यअह्ण दर्जाचे राहत असल्याने भारनियमनमुक्त आहे. खामगांव उपविभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयद्वारा मार्च २0१४ पासून वीज देयकाची नियमित वसुली व्हावी यासाठी मोहीम राबविल्या जात आहे. या मोहिमे अंतर्गत ध्वनीक्षेपक ावरुन देयक भरण्यासाठी आवाहन करणे तसेच कर्मचार्यांकडून घरोघरी जावून नियमित वीज देयक भरण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे. सदरची मोहीम उपविभागीय कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के, शहर अभियंता गणेश एकडे. यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे ग्राहकांमध्ये नियमित देयक भरण्याबाबत जागृती होत असून यामुळे खामगाव शहराचा दर्जा न घसरता ह्यअह्णवर्ग कायम आहे. यामुळे खामगाव शहर भारनियमनमुक्त राहत आहे. खामगाव शहरातून ६ कोटी २0 लाख ३९ हजाराची वसुली वीज वितरण कंपनीकडून खामगांव शहरात गत मार्च महिन्यात २ कोटी ६२ लाख ७५ हजार रूपये, एप्रिल महिन्यात २ कोटी ७ लाख ५७ हजार रुपये तर मे महिन्यात १ कोटी ५0 लाख ७ हजार रूपये वसुली करण्यात आली आहे. तर खामगाव ग्रामीणमधून मार्च महिन्यात १ कोटी २४ लाख ७२ हजार, एप्रिल महिन्यात ६८ लाख ३८ हजार रूपये, मे महिन्यात ६0 लाख ७३ हजार रूपये, अशी खामगाव तालुक्यातून एकूण ८ कोटी ७४ लाख २२ हजार रूपयांची वसुली वीज देयकापोटी करण्यात आली आहे. तर वीज वितरण कंपनीच्या मेहकर कार्यालय अंतर्गत मार्च महिन्यात २ कोटी २0 लाख २९ हजाराची वसुली झाली. एप्रिल महिन्यात ७१ लाख १ हजार, मे महिन्यात ७४ लाख ८९ हजार रूपये वसुली झाली. लोणार कार्यालय अंतर्गत मार्च महिन्यात ८४ लाख ८ हजार रूपये, एप्रिल महिन्यात ३0 लाख २९ हजार तर मे महिन्यात २६ लाख ५१ हजार रूपये देयकापोटी वसुली झाली. शेगांव कार्यालय अंतर्गत महावितरण कंपनीने मार्च महिन्यात १ कोटी १६ लाख २५ हजार रूपये एप्रिल महिन्यात १ कोटी २२ लाख तर मे महिन्यात ९३ लाख ७ हजार रूपये वसुली झाली. संग्रामपूर वीज वितरण कार्यालय अंतर्गत येणार्या गावांमधून मार्च महिन्यात ८१ लाख ९९ हजार रूपये एप्रिल ३३ लाख तर मे महिन्यात ३४ लाख ६९ हजार रूपये वसुली करण्यात आली. खामगांव कार्यालय अंतर्गत येणार्या ५ तालुक्यातून सर्वात जास्त वसुली खामगांव तालुक्यात सर्वात कमी लोणार तालुक्यात झाली. महावितरण कंपनीद्वारा नियमित झालेल्या या वसुलीमुळे खामगांव शहर उन्हाळ्याच्या दिवसाम भारनियमनमुक्त राहिले त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळाली. ऑनलाईन सेवेचा लाभ घ्यावा- अशोक म्हस्के नागरिकांकडून देयक भरण्यासाठी महावितरण कंपनी कार्यालयास प्राथमिकता देण्यात येते. मात्र या ठिकाणी लांबलचक रांग लागत असल्याने ग्राहकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे महावितरणकडून ऑनलाईन देयक भरण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. महा ई सेवा केंद्रावरही देयक भरता येते. त्यामुळे या सेवांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी केले आहे.