लोकसहभागातून सुरू होणार विद्युत विकास
By Admin | Updated: May 9, 2015 01:53 IST2015-05-09T01:53:08+5:302015-05-09T01:53:08+5:30
बुलडाणा मतदार संघासाठी पथदश्री प्रकल्प; १00 गावात होणार ग्रामसभा.

लोकसहभागातून सुरू होणार विद्युत विकास
बुलडाणा : वीज वितरण यंत्रणा व ग्रामीण भागातील सामान्य जनतेमध्ये नेहमीच समन्वयाचा अभाव असल्याने जनतेच्या तक्रारीचे निरसन होत नाही. त्यामुळे वीज कंपनीवर नागरिकांचा नेहमीच रोष असतो. ही दरी दूर करण्यासाठी आणि गावपातळीवर शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विजेच्या संदर्भातील समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी लोकसहभागातून विद्युत विकास हा पायलट प्रोजेक्ट बुलडाणा मतदार संघात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात या प्रकल्पाकरिता ७ मेपासून ग्रामसभा घेतल्या जात असून याबाबत शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळात ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आ. स पकाळ यांनी ही संकल्पना मांडल्यानंतर शासनाने याला मंजुरात दिली. त्यानुसार बुलडाणा म तदार संघात १00 ग्रामसभेच्या माध्यमातून सर्व गावाची निलप्रत तयार होणार आहे. ७ मे पासून या पथदश्री कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार असून, या सभेला वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता स्वत: उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतील, तसेच कोणत्या गावात किती व कोणत्या ठिकाणी विद्युत ड.ीपी. बसवायची, याबाबत शेतकर्यांच्या सूचना ऐकून घेतील व त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाईल.