वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने वीजग्राहक त्रस्त

By Admin | Updated: July 20, 2016 00:23 IST2016-07-20T00:23:59+5:302016-07-20T00:23:59+5:30

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कर्मचा-यांची वानवा असून नागरिकांना हेलपाटे पडत आहे.

The electricity company's cumbersome system loses power consumers | वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने वीजग्राहक त्रस्त

वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने वीजग्राहक त्रस्त

धामणगावबढे (जि. बुलडाणा) : मोताळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या धामणगाव बढे येथे जनतेला गेल्या एका महिन्यापासून विजेच्या विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण वीज ग्राहक त्रस्त झाला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य रामदास चौथनकर यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे १९ जुलै रोजी केली.
गत महिन्याभरापासून गावात विजेची समस्या निर्माण झाली असून, बर्‍याच वेळा रात्री वीज गायब असते, यामुळे महिला, लहान मुले, वृद्धांना त्रास सहन करावा लागतो. शिवाय गावातील काही भाग आठवड्याभरापासून अंधारात आहे. याबाबत तक्रार नोंदणी करण्यास गेले असता, गावामध्ये वीज वितरण कंपनीचे कार्यालयात कधीही कोणताही कर्मचारी सापडत नाही. उपअभियंता वा कर्मचारी कोणीही गावामध्ये राहत नाही. त्यामुळे तक्रार नोंदवायची कोणाकडे, असा प्रश्न सामान्य वीज ग्राहकांपुढे निर्माण होतो. येथील वीज कार्यालयात कर्मचार्‍यांचे बरेच पद रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामावर जाणवतो. याबाबत नागरिकांची बर्‍याचवेळा कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारही केली; मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. पावसाळ्यात गावात वारंवार विजेची समस्या निर्माण होते. रात्री वीज गेल्यास बर्‍याच वेळा ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते.

Web Title: The electricity company's cumbersome system loses power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.